या टीप्सने विकत घेण्यापूर्वीच ओळखा कलिंंगड गोड आणि रसदार आहे

उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की भरपेट जेवणाची इच्छा कामी होते. 

Updated: Apr 24, 2018, 09:39 AM IST
या टीप्सने विकत घेण्यापूर्वीच ओळखा कलिंंगड गोड आणि रसदार आहे title=

 मुंबई : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की भरपेट जेवणाची इच्छा कामी होते. या दिवसामध्ये डीहायड्रेशनची समस्या हमखास वाढते. त्याकडे वेळीच लक्ष न दिल्यास हा त्रास गंभीर होण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात कलिंगड हमखास बाजारात उपलब्ध असतात. उन्हाळ्यात जसे आंबा, फणस यांची आवर्जुन वाट पाहिली जाते तसेच कलिंगडही हमखास खाल्ले जाते. कलिंगड हे पाणीदार आणि गोड असल्याने उन्हाळ्यात डीहायड्रेशनचा त्रास आटोक्यात ठेवण्यासोबतच शरीरात उर्जा निर्माण करण्यास मदत करते.  
 
 कलिंगड हे गोड आणि पाणीदार असणं गरजेचे आहे. अनेकदा फळविक्रेते तुम्हांला याबाबत खोट्या आशा दाखवून फसवणूक करतात. त्यामुळे विकत घेण्यापूर्वीच कलिंगड लाल आणि गोड आहे की नाही? हे ओळखण्यासाठी या  काही टीप्स नक्की लक्षात ठेवा.  

 कलिगंड गोड आणि पाणीदार आहे हे कसे ओळखाल ?  

 कलिंगडावरील पिवळे डाग 

 कलिंगड विकत घेताना त्यावर पिवळे डाग आहेत का? हे तुम्ही नक्की पाहूण घेणं गरजेचे आहे. अनेकदा लोकं पूर्ण हिरावेगार कलिंगड विकत घेण्याची चूक करतात. मात्र असे हिरवेगार कलिगड आतून कच्चे असू शकते.  कलिंगडावर पिवळे डाग आहेत म्हणजे हे कलिंगड शेतात, उन्हात पिकलेले आहे याचा संकेत देतात. अन्यथा काही केमिकल इंजेक्शनचा वापर करून कलिंगड पिकवले जाते, ते लालसर केले जाते. 

 वजनदार  

 तुम्हांला दोन सारख्याच आकाराची कलिंगड दिसत असतील तर त्यांना हातामध्ये घेऊन बघा. ज्याचं वजन जास्त वाटेल त्याची निवड करा. कारण रसदार आणि गोड कलिंगड हे वजनाला जड असतं.  

 चमकदार कलिंगड टाळा  

 कलिंगडावर पिवळे डाग असतील तर ते योग्य प्रकारे पिकवलेले असतात. सोबतच रसदार आणि गोड कलिंगडाची निवड करताना ते अनावश्यक चमकदार नाहीत ना? याची काळजी घ्या. चमकदार कलिंगड हे अनेकदा आतून कच्चे असते.  

 ओव्हल शेप निवडा  

 कलिंगडाचा आकार हा ओव्हल आकाराचा असेल असे पहा. इतर आकाराचे कलिंगड आतून कच्चे असू शकतात. या फायद्यांसाठी अवश्य खा कलिंगड!