Teeth Cleaning: 'या' घरगुती उपयांनी दात होतील मोत्यासारखे पांढरे शुभ्र

 4 घरगुती उपाय पाहूया, ज्याच्या मदतीने तुमचे दात सहज पांढरे शुभ्र ठेवण्यास मदत होईल.

Updated: Apr 30, 2022, 01:28 PM IST
Teeth Cleaning: 'या' घरगुती उपयांनी दात होतील मोत्यासारखे पांढरे शुभ्र title=

मुंबई : शरीराच्या सर्व अवयवांची आपण काळजी काळजी घेतो, परंतु दात पिवळे होण्याकडे सहसा दुर्लक्ष करतो. दात पिवळे असल्यास अनेकवेळा चारचौघात आपल्याला लाज वाटते. जरी आपण दररोज दात घासत असलो, तरीही आपल्याला अपेक्षित परिणाम मिळत नाही. चला ते 4 घरगुती उपाय पाहूया, ज्याच्या मदतीने तुमचे दात सहज पांढरे शुभ्र ठेवण्यास मदत होईल.

आलं

आल्याचे छोटे तुकडे मिक्सर घालून बारीक करा आणि नंतर त्यात 1/4 चमचे मीठ मिसळा. त्यात लिंबाचा रसही मिसळा. या तिन्ही गोष्टींचं मिश्रण टूथब्रशने दातांवर घासावं. यामुळे दात पांढरे होण्यास मदत होते.

कोको पावडर

कोको पावडर पाण्यात किंवा खोबरेल तेल मिसळून पेस्ट बनवा. नंतर ब्रशवर लावून दात स्वच्छ करा. या मिश्रणाच्या वापराने दातांची चमक पुन्हा येईल.

पुदीन्याची पानं

पुदिना खूप फायदेशीर मानला जातो. 3 किंवा 4 पुदीन्याची पानं बारीक करून ती खोबरेल तेलात मिसळा. हे मिश्रण टूथब्रशवर लावा आणि दात घासा. हे मिश्रण फार फायदेशीर मानलं जातं.

कडुलिंबाची पानं

कडुलिंबाचे औषधी गुणधर्म सर्वांना माहीत आहेत. यासाठी कडुलिंबाची पानं एका भांड्यात ठेवून गरम पाण्यात उकळवा. नंतर पाणी काढून करा ती थंड होण्याची वाट पाहा. आता या पाण्याने गुळण्या करा. कडुलिंबाच्या कडूपणामुळे तोंड आणि दातांमध्ये असलेले जंतू नष्ट होतात.