मुंबई : दिवसभर दमल्या-थकल्यानंतर रात्री झोपताना पाय भयंकर दुखतात का? ही समस्या आजकाल अनेकांना उद्भवते. पण या खास उपायांनी तुम्ही पायदुखी कमी करु शकता. पाहुया काय आहेत उपाय...
पाय दुखत असल्यास प्रथम बर्फाचे तुकडे एका कपड्यात गुंडाळून वेदना होत असलेल्या जागी लावा. नीट शेकवा. असे केल्याने लगेचच आराम मिळेल.
आर्थराईटिस यांसारख्या गंभीर आजारांवर देखील अॅपल व्हिनेगर फायदेशीर आहे. आर्थराईटिस सारख्या आजारांवर उपाय म्हणून एक चमचा अॅपल व्हिनेगर गरम पाण्याच्या टबात घाला आणि त्यात पाय अर्धा तास बुडवून ठेवा. नक्कीच आराम मिळेल.
जाड मीठ देखील पायदुखीवर उपयुक्त ठरतं. गरम पाण्यात मीठ घालून काही वेळ त्यात पाय बुडवून ठेवा. पायदुखी कमी होण्यास मदत होईल.
ऑलिव्ह ऑईल किंवा खोबरेल तेलाने दिवसातून २-३ वेळा मसाज केल्याने नक्कीच फायदा होईल.
हळद बहुगुणी आहे, हे आपण जाणतोच. पायदुखी कमी करण्यासाठी हळदीत गरम तिळाचे तेल घाला आणि पायाला लावा. गरम दूधात हळद घालून घेतल्याने देखील पायदुखीवर आराम मिळेल.