High Cholesterol : सेक्स दरम्यान वेदना होत असतील तर...; हाय कोलेस्ट्रॉलच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!

High Cholesterol Pain Sign : मुळात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं की, शरीराच्या काही भागांमध्ये वेदना जाणवू लागतात.  तुम्हालाही हे संकेत दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. जाणून घेऊया कोलेस्ट्रॉल ( High Cholesterol ) वाढल्याने शरीरातील कोणत्या भागांमध्ये वेदना होतात.

Updated: Jul 13, 2023, 05:17 PM IST
High Cholesterol : सेक्स दरम्यान वेदना होत असतील तर...; हाय कोलेस्ट्रॉलच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका! title=

High Cholesterol Pain Sign : आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलचं ( Cholesterol ) प्रमाण वाढलं की हार्ट अटॅकचा ( Heart Attack ) धोका वाढतो. ज्यावेळी आपल्या शरीरात रक्त पुरवठा होणारा प्रवाह कमी होतो, त्यावेळी नसा ब्लॉक झाल्या असल्याचा तो इशारा असतो. नसा ब्लॉक होण्यामागे महत्त्वाचं कारण म्हणजे कोलेस्ट्रॉल. शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्याने त्याचा परिणाम ब्लड सर्कुलेशनवर ( Cholesterol ) होतो. मुळात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं की, शरीराच्या काही भागांमध्ये वेदना जाणवू लागतात.  

हाय कोलेस्ट्रॉलचे ( High Cholesterol ) काही संकेत आहे, जे शरीराच्या काही भागांमध्ये दिसून येतात. जर तुम्हालाही हे संकेत दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. जाणून घेऊया कोलेस्ट्रॉल ( High Cholesterol ) वाढल्याने शरीरातील कोणत्या भागांमध्ये वेदना होतात.

हाता-पायामध्ये होतात वेदना

जर तुमच्या हाता-पायांमध्ये वेदना होत असतील तर हे हाय कोलेस्ट्रॉलचं ( High Cholesterol ) लक्षण मानलं जातं. पेरिफेरल आर्टरी डिजीजमध्ये हात आणि पाय दुखू लागतात. यावेळी रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे अडथळा निर्माण होतो. पेरिफेरल आर्टरी डिसीजमुळे तुमचे पाय किंवा पाय सुन्न होऊ शकतात आणि मुंग्या देखील येऊ लागतात. त्यामुळे असी समस्या दिसून आल्यावर कोलेस्ट्रॉलची ( High Cholesterol ) समस्या उद्भवू शकते. 

छातीत तीव्र वेदना होणं

अनेकजण छातीत वेदना होऊ लागल्या की त्या एसिडीटीमुळे होत असल्याचा समज करून घेतात. मात्र धमन्यामध्ये कोलेस्ट्रॉल ( High Cholesterol ) जमा झाल्याने हार्टवर प्रेशर ( Heart Preassure ) येऊ लागतं. अशावेळी श्वास घेताना छातीत वेदना होऊ शकतात. त्यामुळे जर छातीत वेदना होत असतील तर हे वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचं लक्षण समजावं. 

सेक्स करताना वेदना होणं

जर्नल ऑफ सेक्शुअल मेडिसिनमधील एका अभ्यासात असं दिसून आलं होतं की, महिला आणि पुरुषांमध्ये उच्च कोलेस्ट्रॉलमुळे लैंगिक उत्तेजना कमी होते. एथेरोस्क्लेरोसिस ही एक सामान्य स्थिती असून यामध्ये चिकट पदार्थ धमन्यांच्या आत तयार होतो. यावेळी सेक्स दरम्यान, जननेंद्रियातील रक्तवाहिन्यांचा विस्तार होतो, जेणेकरून रक्तप्रवाह अधिक प्रमाणात होऊ शकेल. मात्र यामध्ये कोलेस्ट्रॉल जमा असल्याने सुरळीत रक्तपुरवठा होत नाही आणि वेदना वाढतात.

सांधेदुखी 

प्रिन्स चार्ल्स हॉस्पिटलमधील एका संशोधकांच्या टीमने उच्च कोलेस्ट्रॉल ( High Cholesterol ) पातळी आणि सांधे खराब होणं यांच्यामध्ये संबंध असल्याचं शोधलं होतं. त्यामुळे या जर तुमचे सांधे दुखत असतील तर त्यामागे कोलेस्ट्रॉल हे देखील एक कारण असू शकतं.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)