High cholesterol : तुमच्या 'या' चुकांमुळे नसांमध्ये जमा होतंय कोलेस्ट्रॉल; कंट्रोल करणं होईल कठीण

High cholesterol : दैनंदिन जीवनात तुम्ही काही चुका करता, ज्यामुळे तुमच्या नसांमध्ये कोलेस्ट्रॉल ( High cholesterol ) जमा होतं. कोलेस्ट्रॉल वाढलं की, हृदयाकडे ( Heart ) जाणारा रक्तप्रवाह कमी होतो आणि हृदयविकाराचा झटका ( Heart Attack ) येण्याचा धोका वाढतो. 

Updated: May 22, 2023, 07:30 PM IST
High cholesterol : तुमच्या 'या' चुकांमुळे नसांमध्ये जमा होतंय कोलेस्ट्रॉल; कंट्रोल करणं होईल कठीण title=

High cholesterol : सध्याच्या घडीला अनेकांमध्ये कोलेस्ट्रॉलची (  cholesterol ) समस्या दिसून येते. आजकाल चुकीच्या लाईफस्ट्राईलमुळे आणि अवेळी जेवणामुळे अनेकांना कोलेस्ट्रॉल वाढल्याचं दिसून येतं. चांगलं कोलेस्ट्रॉल रक्तात जमा होणारी चरबी कमी करण्यास मदत होते. मात्र दुसरीकडे खराब कोलेस्ट्रॉल खूप धोकादायक मानलं जातं. तुमच्या शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल ( Bad cholesterol ) वाढलं की, हृदयाकडे ( Heart ) जाणारा रक्तप्रवाह कमी होतो आणि हृदयविकाराचा झटका ( Heart Attack ) येण्याचा धोका वाढतो. 

यासाठी तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल ( High cholesterol ) जमा होणार नाही, याची काळजी घ्यावी. दैनंदिन जीवनात तुम्ही काही चुका करता, ज्यामुळे तुमच्या नसांमध्ये कोलेस्ट्रॉल ( High cholesterol ) जमा होऊ शकतो. जाणून घेऊया तुमच्या कोणत्या चुकांमध्ये शरीरात जमा होतंय.

तुमचा आहार

आजकाल अनेक लोकांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्याची समस्या दिसून येते. मुळात शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी योग्य आहार घेणं फार महत्त्वाचं आहे. जर तुमचा आहार योग्य असेल आणि तुम्ही डाएट प्लान योग्य पद्धतीने पाळत असाल तर कोलेस्ट्रॉलची ( High cholesterol ) समस्या तुम्हाला त्रास देणार नाही. बरेच लोक त्यांच्या डाएट प्लॅन पाळत नाहीत. कोलेस्ट्रॉलची ( High cholesterol ) समस्या कमी करायची असल्यास तुम्हाला धान्य, भाज्या तसंच फळं यांचा करावा.

औषधं न घेणं

जर तमच्या रक्तवाहिन्यांमध्ये वाईट कोलेस्ट्रॉलची ( Bad cholesterol ) पातळी अधिक असेल तर डॉक्टर तुम्हाला काही औषधं लिहून देतात. वाढलेलं कोलेस्ट्रॉल ( High cholesterol ) नियंत्रणात आणायचं असेल तर त्यासाठी औषधंही खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे अशा परिस्थितीत कोलेस्ट्रॉलची औषधे नियमित घेतली गेली पाहिजेत. कोलेस्ट्रॉलमुळे ( High cholesterol ) होणारे मोठे आजार टाळण्यासाठी औषधं घेणं गरजेचं आहे. 

धुम्रपान आणि मद्यपान

जर तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल तर तुम्ही आहारासोबत काही पथ्यंही पाळली पाहिजेत. यावेळी तुम्ही तुम्ही मद्यपान आणि धूम्रपान करणं टाळलं पाहिजे. या दोन्ही गोष्टींमुळे तुमचं कोलेस्टेरॉल कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता असते. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी औषधांसोबतच दारू आणि सिगारेटपासून दूर राहिलं पाहिजे.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)