मुंबई : एखाद्याच्या शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यांसारख्या अनेक गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. मुळात शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात, चांगलं कोलेस्ट्रॉल ज्याला एचडीएल कोलेस्ट्रॉल असंही म्हणतात. तर दुसरं बॅड कोलेस्ट्रॉल, ज्याला एलडीएल कोलेस्ट्रॉल म्हणतात.
कोलेस्ट्रॉल हा मेणासारखा एक घटक असतो जो, कोणत्याही व्यक्तीच्या रक्तात आढळून येतो. जेव्हा रक्तातील चांगलं कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि वाईट कोलेस्ट्रॉल वाढू लागतं तेव्हा रक्तवाहिन्या खराब होतात, ज्यामुळे गंभीर आजार देखील वाढतात.
जर तुम्हाला वाईट कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या आरोग्याची आणि खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. यामध्ये तुम्हाला तुमच्या अनेक सवयी आणि खाणं-पिणं स्वतःपासून दूर कराव्या लागतील. या सवयी बदलल्या नाहीत, तर त्याच्याशी झगडणाऱ्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. जर वेळेत या सवयी बदलल्या तर पुढची जीवनशैली निरोगी आणि आनंदी होईल.