Monkeypox: देशात कोरोनानंतर वाढतोय मंकीपॉक्स; 'या' ठिकाणी रूग्णसंख्येत वाढ

पुन्हा एकदा नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन कऱण्यात आलं आहे.

Updated: Sep 30, 2022, 06:25 AM IST
Monkeypox: देशात कोरोनानंतर वाढतोय मंकीपॉक्स; 'या' ठिकाणी रूग्णसंख्येत वाढ title=

दिल्ली : देशात कोरोनानंतर मंकीपॉक्स व्हायरसचे रुग्ण वाढतायत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत मंकीपॉक्सची आणखी तीन प्रकरणं समोर आल्यानंतर या संसर्गाचा आकडा 12 वर पोहोचला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन कऱण्यात आलं आहे.

नायजेरियन महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह 

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात मंकीपॉक्सचे पाच रुग्ण दाखल आहेत. नुकतीच मंकीपॉक्सची चाचणी पॉझिटिव्ह आढळून आलेली 30 वर्षीय नायजेरियन महिला या संसर्गाची नववी रूग्ण आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, 'आतापर्यंत मंकीपॉक्सचे बारा रुग्ण आढळून आले आहेत. लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात सध्या मंकीपॉक्सचे पाच रुग्ण दाखल आहेत. 

एलएनजेपी रुग्णालयात उपचार सुरू आहेत

यापूर्वी अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, 30 वर्षीय नायजेरियन व्यक्तीला मंकीपॉक्सचा संशयित रुग्ण म्हणून रविवारी या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. लोकनायक जयप्रकाश नारायण हॉस्पिटल आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी केलेल्या नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार, पहिल्या पाच प्रकरणांमध्ये "अधूनमधून हलका ते मध्यम ताप, अंगदुखी, गुप्तांग आणि पायांना फोड अशी लक्षणं होती.

जुलै महिन्यात सापडला पहिला रूग्ण 

जुलै महिन्यात भारतात मंकीपॉक्स व्हायरसचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्याच वेळी, राजधानी दिल्लीत मंकीपॉक्सचं पहिलं प्रकरण समोर आलं. यानंतर राजधानीत अनेक प्रकरणं नोंदवली गेली आणि अनेक लोक या आजारातून बरेही झाले.