Hepatitis Viruses news in Marathi : आपल्या सभोवतालच्या वातावरणात अनेक बदल घडत आहेत. संपूर्ण जगाला पर्यावरणीय संकटाचा सामना करावा लागत आहे. बहुतांश देशांमध्येहवामान बदलाचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतात. अशातच कोरोनाची धास्ती गेली असली तरी इतर संसर्गजन्य आजार संपायचं नाव घेत नाही. जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या अहवालानुसार जगावर हेपटायटीस संसर्गाची साथ पसरत आहे. या संसर्गामुळे दररोज 3500 लोकांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नेमका हा आजार काय आहे? त्याची लक्षणे कोणती? जाणून घ्या सविस्तर बातमी...
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) 2024 च्या जागतिक हिपॅटायटीस अहवालानुसार, 2022 मध्ये 1.3 दशलक्ष लोकांचा मृत्यृ झाला आहे. व्हायरल हेपेटायटीस हे जागतिक स्तरावर मृत्यूचे दुसरे प्रमुख संसर्गजन्य कारण बनले आहे. हेपटायटीस हा यकृताचा एक दाह असून हेपटायटीस विषाणूमुळे होतो. त्यामुळे शरीरातील ऊतींना दुखापत किंवा संसर्गा झाल्यास सूज येते. यामुळे शरीरातील इतर अवयवांचे नुकसान होते. विविध अभ्यासांनुसार, हेपटायटीस ए, बी, सी, डी आणि ई सह अनेक प्रकारचे विषाणू हेपेटायटीसचे कारण आहेत. याव्यतिरिक्त, हिपॅटायटीस ए आणि हिपॅटायटीस ई संक्रमित व्यक्तीच्या विष्ठेद्वारे किंवा दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे प्रसारित केले जाऊ शकतात.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ने जारी केलेल्या अहवालानुसार विषाणूजन्य हेपटायटीसमुळे मृत्यू झालेल्यांची अंदाजे संख्या 2019 मध्ये 1.1 दशलक्ष आणि 2022 मध्ये 1.3 दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 83 टक्के हेपेटायटीस बी आणि 17 टक्के हेपेटायटीस सीमुळे होतात. यामुळे दररोज 3500 लोकांचा मृत्यू होतो. तसेच 187 देशांतील आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, व्हायरल हेपेटायटीसमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या 2019 मध्ये 11 लाखांवरून 2022 मध्ये 13 लाखांपर्यंत वाढल आहे. यापैकी 83 टक्के मृत्यू हेपेटायटीस बी मुळे तर 17 टक्के मृत्यू हेपेटायटीस सी मुळे होतात. हेपेटायटीस बी आणि सी संसर्गामुळे जगभरात दररोज 3,500 लोकांचा मृत्यू होत असल्याची नोंद आहे.
बांग्लादेश, चीन, इथिओपिया, भारत, इंडोनेशिया, नायजेरिया, पाकिस्तान, फिलीपिन्स, रशियन फेडरेशन आणि व्हिएतनाम हे हेपेटायटीस बी आणि सी या दोन्ही तृतीयांश संक्रमणे आहेत. प्रभावी जेनेरिक व्हायरल हेपेटायटीस औषधांची उपलब्धता असूनही, अनेक देश ती घेऊ शकत नाहीत किंवा परवडत नाहीत, असे आरोग्य संघटनेने आपल्या अहवालात म्हटले आहे.
हेपटायटीसने ग्रस्त असलेल्या बऱ्याच लोकांना गडद लघवी, असह्य पोटदुखी, कावीळ, ताप, भूक न लागणे, अशक्तपणा वाटणे, डोके दुखणे यासारखी लक्षणे जाणवतात. या लक्षणांची नोंद घेऊन डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य उपचार घेणे आवश्यक आहे.