Hemoglobin Range: वयोमानानुसार तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनची पातळी किती असली पाहिजे? पाहा संपूर्ण चार्ट

जर रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी (Hemoglobin Range) योग्य प्रमाणात असेल शरीराचे संपूर्ण कार्य चांगल्या पद्धतीने सुरु राहतं. मात्र त्याउलट जर तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण झाली तर त्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

Updated: Apr 19, 2023, 06:33 PM IST
Hemoglobin Range: वयोमानानुसार तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनची पातळी किती असली पाहिजे? पाहा संपूर्ण चार्ट title=

Hemoglobin Range: आपल्या शरीरात प्रत्येक गोष्ट योग्य प्रमाणात असणं फार गरजेचं असतं. यामध्ये आपण अनेक गोष्टींची काळजी घेतो. यावेळी कोलेस्ट्रॉलची योग्य पातळी, ब्लड प्रेशर इत्यादी. मात्र तुम्ही कधी हिमोग्लोबिनच्या पातळीविषयी (Hemoglobin Range) माहिती घेतलीये का? जर रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी (Hemoglobin Range) योग्य प्रमाणात असेल शरीराचे संपूर्ण कार्य चांगल्या पद्धतीने सुरु राहतं. मात्र त्याउलट जर तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण झाली तर त्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

हिमोग्लोबिन (Hemoglobin) का महत्त्वाचं?

आपल्या शरीरामध्ये साधारपणे 4-5 लीटर रक्त (Blood) असलं पाहिजे. जर हिमोग्लोबिनची पातळी तुमच्या शरीरात योग्य प्रमाणात असेल तर प्रत्येक अवयवांना पोषक तत्व, हार्मोन आणि गॅस या गोष्टी पोहोचण्यास मदत होते. याशिवाय आपल्या शरीरात असलेले टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतं. त्यामुळे शरीरात हिमोग्लोबिनची पातळी योग्य प्रमाणात ठेवणं महत्त्वाचं असतं. 

हिमोग्लेबिनचं प्रमाण सामान्यपणे किती असलं पाहिजे?

पुरुषांमध्ये हिमोग्लोबिनची पातळी ही सामान्यपणे 13.5-17.5 ग्रॅम प्रति डेसीलिटर असली पाहिजे. मुख्य म्हणजे महिला आणि पुरुष यांच्यामधील हिमोग्लोबिनच्या प्रमाणाची पातळी ही वेगवेगळी असते. त्यामुळे स्त्रियांमध्ये ही पातळी 12.0 - 15.5 ग्रॅम प्रति डेसीलिटर असणं गरजेचं आहे. 

वयोमानानुसार हिमोग्लोबिन किती प्रमाणात असलं पाहिजे?

  • नवजात बालक: 14-24 g/dL 0-2 
  • एका आठवड्याचं बालक: 12-20 g/dL 2-6 
  • महिन्याभराचं बालक: 10-17 g/dL 
  • 6 महीने-1 वर्षांपर्यंतच बालक: 9.5-14 g/dL 
  • 1-6 वर्षांपर्यंतच मूल: 9.5-14 g/dL 
  • 6-18 वर्षे: 10-15.5 g/dL 
  • वयस्क पुरुष: 14-18 g/dL 
  • वयस्क महिला: 12-16 g/dL 
  • गरोदर माता  : >11 g/dL 

शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास ही लक्षणं दिसून येतात

  • सतत थकवा जाणवणं
  • चालताना धाप लागणं
  • चक्कर येणं
  • सतत भिती वाटणं
  • अशक्तपणा
  • लक्ष केंद्रीत करण्यामध्ये समस्या
  • डोकेदुखी
  • सतत चिडचिड होणं

या कारणांमुळे जाणवू शकते हिमोग्लोबिनची कमतरता

हिमोग्लोबिनची कमतरता ही आर्यनच्या कमीमुळे निर्माण होते. याशिवाय जर एखाद्या महिलेला मासिक पाळीमध्ये अधिक रक्तस्त्राव झाला तरीही हिमोग्लोबिनच्या पातळीमध्ये असमतोल होण्याची शक्यता असते. गरोदर महिलांनी हिमोग्लोबिनच्या पातळीकडे अधिक लक्ष देणं गरजेचं आहे.