How Much Exercise: निरोगी आरोग्यासाठी आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आपण कितीही डाएट केले तरीदेखील शरीराला व्यायामाची गरज असते. व्यायामामुळं शरीराच्या अनेक व्याधींना दूर करता येते. पण व्यायाम किती करावा. रोज तास् न तास जिममध्ये घाम गाळावा की काही मिनिटं केलेला व्यायाम शरीरासाठी पुरेसा ठरतो का? अलीकडेच एका संशोधनात समोर आले आहे की, शरीर निरोगी ठेवण्यासाठी व फिट राहण्यासाठी अति व्यायम करण्याची गरज नाहीये. कमीत कमी वेळात व्यायाम करुनही तुम्ही फिटनेस योग्य राखू शकणार आहात.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हेल्दी आरोग्यासाठी रोज 20 ते 30 मिनिटांचा वॉक पुरेसा असतो. मध्यम गतीने वॉक घेणेही खूप चांगलं ठरु शकते. त्याचबरोबर, वॉक, रनिंग, सायकलिंग, स्विमिंग यासारखे हलके व्यायामदेखील तुम्ही करु शकता. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही आठवड्याला 150 मिनिटे मध्यम तीव्रता असलेले व्यायाम करु शकता. किंवा 72 मिनिटे अधिक तीव्रता असलेले व्यायाम देखील करु शकता. या व्यायामामुळं हृद्याचे आरोग्य तर सुधारतेच पण स्नायूंना बळकटी येणे आणि मानसिक आरोग्यदेखील सुधारते. तज्ज्ञांच्या मते शरीर सक्रीय ठेवण्यासाठी आठवड्याभरात कमीत कमी पाच दिवस 30 मिनिटे व्यायाम करणे खूप गरजेचे आहे.
तुमच्याकडे वेळ कमी असल्यास, हाई-इंटेंसिटी इंटरवल ट्रेनिंग (HIIT) हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. या प्रकारच्या व्यायामामुळे कमी वेळेत जास्त कॅलरी बर्न होतात आणि चयापचय देखील वाढतो. HIIT वर्कआउट म्हणजे तुम्ही थोड्या काळासाठी खूप तीव्रतेने व्यायाम करा आणि नंतर विश्रांती घ्या. हा व्यायमप्रकार 10 ते 15 मिनिटे देखील केला जाऊ शकते. या शिवाय जिने चढणे, चालणे, घरातील कामे करणे यांसारखी दैनंदिन कामेही शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
कमी वेळेत जास्त केलेल्या व्यायाम आरोग्यासाठी फायदेशीर असला तरी तो नियमितपणे करणे गरजेचे आहे. व्यायामाचा पर्याय नाही. तर, तुम्हाला आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर व्यायाम करण्यावाचून काही पर्याय नाही. त्याचबरोबर, संतुलित आहार आणि पुरेशी झोप हे देखील खूप गरजेचे आहे. व्यायाम जितका महत्त्वाचा आहे, तितकाच त्याचा समतोल आणि सातत्यही महत्त्वाचा आहे, हे नेहमी लक्षात घ्या.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)