नाश्तात पोहे खा आणि झपाट्याने कमी करा वजन; फक्त 'ही' एक चुक पडेल महागात

Poha For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करताय. पण तरीही होत नाहीये. आता तुमच्या डाएटमध्ये थोडा बदल करुन पाहा.

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 6, 2023, 01:37 PM IST
नाश्तात पोहे खा आणि झपाट्याने कमी करा वजन; फक्त 'ही' एक चुक पडेल महागात title=
health tips in marathi maharashtrian kandepohe health benefits and nutritional value for weight loss in marathi

Poha For Weight Loss: ऑफिसमध्ये आठ ते दहा तास बसून काम करणे किंवा वर्क फ्रॉम होम असल्यासच तर किती तास काम करतो याची गणतीच केली जात नाही. कामाच्या व्यापात अनेकदा वेळेवर जेवण होत नाही. तसंच, बैठे काम असेल तर शरीराचा व्यायामही होत नाही. अनहेल्दी जेवण व व्यायामाची कमतरता यामुळं वजन वाढू लागते. वजन वाढायला लागले की अनेक गंभीर आजार जडतात. वजन व लठ्ठपणा वाढल्यास ते कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. पण वजन कमी करणे खूपच आव्हानात्मक असते. पण आज एका पदार्थामुळं तुम्ही तुमची वेट लॉस जर्नी आरामात फॉलो करु शकता. 

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणे खूप महत्त्वाचे आहे. पण कामाच्या गडबडीत व्यायाम करणे राहून जाते किंवा वेळ मिळत नाही. ऑफिसच्या कामासाठी 8 ते 10 तास एकाच ठिकाणी बसून राहावे लागते. अशावेळी तुम्ही तुमच्या डाएटवर भर देऊन वाढत्या वजनांपासून सुटका मिळवू शकता. आपल्या रोजच्या जेवणातील काही पदार्थ खाऊनही तुम्ही झपाट्याने वजन कमी करु शकता. महाराष्ट्रायीन घरात हमखास नाश्तात पोहे बनवले जातात. पण पोहे बनवताना एक चुक केली जाते. ती चुक टाळल्यास तुम्ही पोहे खाऊनही वजन नियंत्रणात राहील. 

पोह्यात अनेक पौष्टिक गुणधर्म

झपाट्याने वजन कमी करण्यासाठी पोहे हा बेस्ट पर्याय आहे. कारण पोह्यात भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडेंट, आयर्नसारखे गुणधर्म असतात. ज्यामुळं तुम्हाला अनेक हेल्थ बेनिफिट्स मिळू शकतात. 

वजन कमी करण्यासाठी उत्तम पर्याय

पोहे हे फायबरचा चांगला स्त्रोत आहे. फायबरने युक्त असलेल्या पदार्थांमुळं पोट दिवसभर भरलेले राहते. अशावेळी लवकर भूख लागत नाही आणि तुम्ही कमी प्रमाणात कॅलरीचा समावेश करता. त्यामुळं वजन कमी करण्यासाठी पोहे तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतात. 

पोह्यात असलेल्या प्रोटीनमुळं वजन कमी होण्यास मदत मिळते. हायप्रोटीनयुक्त जेवण खाल्ल्यामुळं मेटाबॉलिज्म बूस्ट होते आणि फूड क्रेव्हिंग्स कमी होतात. ज्यामुळं तुम्हाला जास्त भूख लागत नाही आणि अशाने तुमचं वजन कमी होण्यास मदत होते. 

इतकंच नव्हे तर, पोह्यात खूप कमी प्रमाणात कॅलरी असतात. त्यामुळं तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये पोह्याचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरते. मात्र, त्यासाठी एक खास गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज असते. 

ही चुक करु नका

नाश्तात पोहे खाल्ल्यास दिवसभर शरीरात उर्जा राहते. मात्र, पोहे बनवताना त्यात भाज्यांचा वापर करा. सामान्यतः पोह्यात बटाट्याचा वापर केला जातो. मात्र बटाट्यात कॅलरीची मात्रा अधिक असते. त्यामुळं वजन कमी करण्याऐवजी अधिक वाढते. तसंच, जेव्हा तुम्ही बटाटे तळून किंवा शिजवून खातात तेव्हा त्यातील कॅलरी 5 टक्क्यांपर्यंत वाढते. त्यामुळं तुमच्या वजनावर परिणाम होऊ शकतो.