Health Tips : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खास उपाय, औषध-गोळ्यांची गरज भासणार नाही

Boost Immunity : कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती काय असते हे आपल्याला समजले. रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या जीवनशैलीमध्ये अनेक बदल केले आहेत. 

श्वेता चव्हाण | Updated: May 26, 2023, 12:51 PM IST
Health Tips : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खास उपाय, औषध-गोळ्यांची गरज भासणार नाही title=
improve immunity power

Boost Immunity In Marathi : बदलत्या वातावरणामुळे, प्रदूषणामुळे, खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयींमुळे अनेक जण सतत आजारी पडत असतात. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी इत्यादी सामान्य समस्या नेहमीच उद्भवतात. या सर्व समस्यांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. अशा वेगवेगळ्या गंभीर आजारांचे तुम्ही शिकार होता. अशावेळी स्वत:ची काळजी घेण्यासाठी तसेच विविध संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवणे आवश्यक आहे. जर  तु्म्हाला पण तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवायची असेल तर जाणून घ्या खास उपाय...

ग्रीन टी आणि ब्लॅक टी - या दोन्हींमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात खूप मदत होते. मात्र याचा वापर दिवसातून केवळ दोन कप सेवन करावेय. जास्त प्रमाणात याचे सेवन केला तर नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. 

लसूण  - कच्चा लसूण खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मोठी मदत होते.कारण त्यात अॅलिसिन, झिंक, सल्फर, सेलेनियम आणि जीवनसत्त्वे ए आणि ई भरपूर प्रमाणात असतात.

दही-  दह्याचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते.यासोबतच पचनसंस्था सुरळीत राहण्यास मदत होते. म्हणजेच दही खाल्ल्याने विविध आजारांपासून तुमचा बचाव होऊ शकतो.

ओट्स - ओट्समध्ये भरपूर फायबर असतात. यात अँटी-मायक्रोबियल गुणधर्म देखील आहेत.म्हणूनच रोज ओट्स खाल्ल्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढू शकते.

व्हिटॅमिन डी - व्हिटॅमिन डी आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या आजारांशी लढण्याची शक्ती मिळते. यासोबतच हाडे मजबूत होतात आणि हृदयाशी संबंधित आजार दूर राहतात. म्हणूनच व्हिटॅमिन डी घेणे गरजेचे असते.

व्हिटॅमिन सी - संसर्गजन्य रोग टाळण्यासाठी व्हिटॅमिन सी घेणे खूप फायदेशीर आहे. लिंबू, आवळा, संत्री यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे व्हिटॅमिन सी असलेली फळे नियमित खावीत.

वाचा: तुम्हाला ही कॉफी प्यायला आवडते का? मग वाचा फायदे आणि तोटे

पपई - पपईमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळते. पपईचे सेवन केल्याने अनेक आजारांपासून आराम मिळतो. पपई दररोज ठराविक प्रमाणात खाऊ शकतो. उन्हाळ्यात याच्या सेवनामुळे शरीरात दिवसभर एनर्जी राहते. 

पेरू - हे फळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पेरू हे त्वचा, शरीर आणि केसांसाठी खूप चांगले आणि पौष्टिक फळ आहे. पेरू हे व्हिटॅमिन ए चा उत्तम स्रोत आहे. ज्यांना गॅस, अपचन, पोटाचा फोबिया आणि बद्धकोष्ठतेची समस्या आहे ते पेरू खातात. याशिवाय रक्त शुद्ध करण्याचे काम पेरू करतो.

फणस - आपल्या शरीरासाठी अतिशय योग्य आहे. हे फळ चविष्ट असून आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. फणसाच्या भाजीतून व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळते. तसेच पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम असे भरपूर गुणधर्म असल्याने फळ खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्तीही झपाट्याने वाढते.

आवळा - आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी जितका फायदेशीर आहे, त्याहून अधिक आवळा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.

अंडी - अंडी तुमच्या शरीराला व्हिटॅमिन-डी देऊ शकतात. अंड्यातील अंड्यातील पिवळ बलक अतिशय पौष्टिक आणि प्रथिने समृद्ध आहे. यातून शरीराला व्हिटॅमिन-डी मिळते. मांसाहारी लोकांसाठी 'मासे' हे व्हिटॅमिन-डीचा उत्तम स्रोत आहे.

 

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)