मुंबई : आपल्या शरीरासाठी पाणी पिणं किती महत्त्वाचं आहे हे आता सर्वांनाच माहीत आहे. निरोगी शरीरासाठी पुरेसं पाणी पिणं खूप महत्वाचं आहे. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशनच्या अनेक गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं. अशा परिस्थितीत निरोगी राहण्यासाठी पुरेसे पाणी प्यावं.
मात्र आयुर्वेदानुसार काही गोष्टी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. होय, अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचं सेवन केल्यानंतर पाणी प्यायल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. चला तर मग जाणून घेऊया या गोष्टींचे सेवन केल्यावर विसरुनही पाणी पिऊ नये.
दूध प्यायल्यानंतर लगेच, चुकूनंही पाणी पिऊ नका. कारण दूध प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने चयापचय क्रिया मंदावते, ज्यामुळे पचनाशी संबंधित समस्या निर्माण होतात. यामुळे गॅस अॅसिडिटी, अपचन आणि पोटात जडपणा यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे दूध प्यायल्यानंतर लगेच पाणी पिणं टाळावं.
थंड पदार्थ खाल्ल्यानंतर लगंच पाणी पिऊ नका. कारण थंड वस्तू खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने दातांमध्ये वेदना आणि दात कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे थंड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणं टाळावं.
लिंबूवर्गीय फळं खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्यास विसरू नका. कारण लिंबूवर्गीय फळं खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने घसा खवखवणं आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे लिंबूवर्गीय फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणं टाळावं.