Vitamin a rich food: सध्या भारतीय मार्केटमध्ये एका फळाची तुफान चर्चा सुरु आहे. हे फळ आपल्या भारतातील नसून चीन मधलं आहे. सामन्यपणे लोकं या फळाला अमरफळ म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये याला परसिमन (Persimmon) असं म्हटलं जातं. शेतीविषयातील तज्ज्ञ या फळाचं ओरीजीन चीन मानतात.
पिवळ्या टोमॅटो सारखं दिसणाऱ्या या फळाचे अनेक फायदे देखील आहेत. भारतीय बाजारपेठांमध्ये हे फळं फार लोकप्रिय आहे. थंडीच्या दिवसांमध्ये या फळाच्या सेवनाने इम्युनिटी वाढण्यास मदत होते. यामुळे अनेक आजारांपासून तुमचं रक्षण होतं. यामध्ये अनेक पोषक तत्त्व असतात ज्यामुळे आजार तुम्हाला होऊ शकत नाही.