मुंबई : रोज थकवा जाणवणं हे शरीरासाठी चांगलं नाही. धावपळीच्या जीवनात बऱ्याचदा या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं. त्याचा मोठा तोटा होत असतो. शरीराची झीज होते. याशिवाय मेंदूही काम हळूहळू करतो. त्यामुळे विशेषत: महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे.
आरोग्याकडे दुर्लक्ष केलं तर अनेक आजारांचा सामना करावा लागतो. ज्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. व्यायाम योग्य आहार यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे निरोगी जीवनाची व्याख्याच बदलून गेली आहे.
या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला टाळायच्या असतील तर तुमचा आहार आणि व्यायाम दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी तुम्ही आजच आहारात काही गोष्टी समाविष्ट करणं गरजेचं आहे.
डाळीमध्ये भरपूर प्रथिने असतात, ती खूप पौष्टिक असतात, त्यामुळे जर तुम्ही तुमच्या आहारात डाळींचा समावेश केला तर ते तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.
डाळीमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे चांगल्या प्रमाणात असतात. त्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल तुम्हाला काम करताना आळस जाणवणार नाही. यासोबत तुम्ही तूप देखील खायला हवं. त्यामुळे ऊर्जा मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
साजूक तूप आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. ते शरीरातील घाण बाहेर टाकण्यासाठी मदत करतं. शरीरात थंडावा निर्माण करतं. त्यामुळे रोज एक चमचा तूप खायला हवं.
फळांमध्ये खूप सत्व आणि पौष्टिक घटक असतात जे शरीरासाठी लाभदायी असतात. प्रत्येक सीझननुसार येणारी फळं आपल्या आहारात असायला हवीत. सगळी फळं खायला हवीत. त्यामुळे मेंदूची वाढ होते. मेंदू अधिक जलदगतीने काम करतो.