Kidney Health Tips: 'आरोग्यम धनसंपदा' या श्लोकावरून आरोग्याचं महत्त्व अधोरेखित होतं. शरीरातील प्रत्येक अवयव महत्त्वाचा असून त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. किडनी (Kidney) हा शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासोबत रक्त स्वच्छ ठेवण्यास मदत करतो. सोडियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम यांसारखी शरीरातील सर्व रसायने संतुलित ठेवण्यात किडनी महत्त्वाची भूमिका बजावते. किडनी खराब झाल्यास शरीरातील हानिकारक घटक बाहेर पडत नाहीत. त्यामुळे शरीरातील व्यवस्था बिघडते. अशा परिस्थितीत किडनीच्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.
-कमी पाणी प्यायल्याने किडनीचं नुकसान होऊ शकतं. रोज पाच ते सात लिटर पाणी पिणं आवश्यक आहे. पाण्याच्या माध्यमातून किडनी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढते. किडनी व्यवस्थित ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे.
-अति गोड खाणं नुकसानदायक ठरू शकतं. त्यात साखरेची मात्रा कमी असणं आवश्यक आहे. साखरेचं अतिसेवन केल्यास किडनी डॅमेज होऊ शकते.
-साखरेसोबत मीठाचं सेवनही नुकसानदायक आहे. आहारात मीठाचं प्रमाण कमी असलं पाहीजे. मीठाच्या अतिसेवनाने किडनीवर परिणाम होतो.
-किडनीच्या आरोग्यासाठी झोपही तितकीच महत्त्वाची आहे. दररोज 7-8 तास झोप घेणं गरजेचं आहे. झोप पूर्ण न झाल्यास किडनीसहित इतर अवयवांवर परिणाम होतो.
-औषधांचं अतिसेवन करणंही किडनीवर परिणाम करतं. जर तुम्ही दररोज पेनकिलर घेत असाल तर त्याचा परिणाम किडनीवर होतो. पेन किलरमध्ये साल्ट असतं आणि त्याचा किडनीवर थेट परिणाम होतो.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)