स्वस्तात मस्त! 'हे' पदार्थ खा आणि थकवा, आळस दूर करा

 त्यात रोजचं बिझी शेड्यूल आणि रात्रीची अपुरी झोप यामुळे अनेकांना दिवसभर थकवा (weakness) जाणतो.

Updated: Aug 2, 2022, 03:59 PM IST
स्वस्तात मस्त! 'हे' पदार्थ खा आणि थकवा, आळस दूर करा title=
health tips add these foods in your diet for energy and cure weakness in marathi

Health Tips - गेल्या काही वर्षांमध्ये आपली जीवनशैली बदलेली आहे. आज घरातील नवराबायको दोघेही कामासाठी घराबाहेर पडतात. त्यामुळे अनेक वेळा अनहेल्दी डाइट (Unhealthy Diet) घेण्याकडे अनेकांचा कल आहे. त्यात रोजचं बिझी शेड्यूल आणि रात्रीची अपुरी झोप यामुळे अनेकांना दिवसभर थकवा (weakness) जाणतो. याचा परिणाम तुमच्या कामावर पडतो. स्पर्धेच्या जगात जर तुम्हाला टिकून राहायचं असेल, तर आपली जीवनशैली आणि हेल्दी डाइट घेणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला असं पदार्थ सांगणार आहोत, ज्यांचा समावेश आहारात केल्यास तुम्हाला थकवा दूर करण्यास मदत होईल.  (health tips add these foods in your diet for energy and cure weakness) 

ग्रीन टी (Green Tea)

ग्रीन टी हे वजन कमी करण्यासाठी आजकाल अनेक जण घेतात. पण या ग्रीन टी घेण्याचा अजून एक फायदा म्हणजे यामुळे तुम्हाला ऊर्जावान बनवतं. तसंच एकाग्रता वाढवण्यासही ग्रीन टीचा फायदा होतो. रोज एक कप ग्रीन टी प्यायलामुळे तुमचा थकवा दूर होतो. 
 
बडीशेप (Fennel Seeds)

बडीशेप ही एक उत्तम माउथ फ्रेशनर आहे. बडीशेपचं सेवन केल्यास शरीरातील सुस्ती दूर होण्यास मदत होते. बडीशेपमध्ये असलेले घटक कॅल्शियम, लोह आणि पोटॅशियमसारखे घटक हे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात.  

दही (Curd)

रोज दुपारच्या जेवण्यात एक वाटी दही खायला हवं. दह्यामधील प्रोटीनमुळे आपण निरोगी राहतो. दही खाल्ल्यामुळे थकवा आणि आळसही दूर होतो. तुम्हाला माहिती आहे रोज एक वाटी दही खाल्ल्याने वजनही नियंत्रणात राहतं. 

पाणी (Water)

निरोगी राहण्यासाठी आपण रोज आपण 8-9 ग्लास पाणी प्यायला हवं. आपण रोज 8-9 ग्लास पाणी प्यायलास आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. पाणी प्यायलामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि थकवा जाणवत नाही. 

ओट्स (Oats)

ओट्समध्ये कर्बोदके असल्यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते.  त्यामुळे नियमित ओट्स खाल्ल्यामुळे तुमच्या थकवा दूर होतो. 

केळी (Banana)

केळीमध्ये भरपूर पोषक घटक आणि कार्ब्स असतात. त्यामुळे केळी खाल्ल्यामुळे तुमचा थकवा दूर होण्यास मदत होते. 

संत्री (Oranges)

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. संत्री खाल्ल्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते आणि शरीराला ऊर्जावान ठेवण्यास मदत होते. 

पालक (Spinach)

पालकमध्ये लोहचं प्रमाण असल्याने हे चरबी बर्न करण्यास मदत करते. तसंच आळस आणि थकवा दूर करण्यासाठी पालकाचं सेवन करावं. 

ड्राय फूड्स (Dry Fruits)

ड्राय फूड्स म्हणजे सुखा मेवा खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला उर्जा मिळते. 

   (Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)