लहान मुलांना लाडात जेवण भरवू नका, हा आहे धोका?

लहान मुलांना लाडात जेवण भरवणे हे मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.  

Updated: Jan 24, 2019, 10:40 PM IST
लहान मुलांना लाडात जेवण भरवू नका, हा आहे धोका? title=

मुंबई : लहान मुलांना चिऊ-काऊचा घास म्हणून जेवण भरवणे हा खरं तर आईसाठी कौतुक सोहळा. पण मुलाला लाडात जेवण भरवणे हे मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे समोर आले आहे. जबरदस्तीनं जेवण भरवल्यास मुलांना लठ्ठपणाचा धोका निर्माण होत असल्याची निष्कर्ष एका आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने काढला आहे.

लहान मुलांना जेवू घालण्यासाठी आईची धडपड असते. त्यासाठी आई चिऊकाऊची गोष्ट सांगते. मुलाच्य़ा हातात खेळणेही देते. मुलानं जास्तीत जास्त खावे असा आईचा आग्रह असतो. पण हा आग्रह तुमच्या मुलाला लठ्ठपणाकडे घेऊन जाऊ शकतो. लहानपणी जबरदस्तीने खाऊ खातलेल्या अन्नामुळे अनेक लहान मुले लठ्ठपणाकडे झुकली आहेत. बाळ गुटगुटीत आहे म्हणून स्वतःची पाठ थोपटवून घेणारे अनेक पालक आहेत. पण गुटगुटीत बाळ हे तुमच्यामुळे लठ्ठ झाले नाही ना, याकडे लक्ष द्या.

- मुलांना भरवताना काळजी घ्या  
- मुलांना किती जेवायला द्यायचं याचं प्रमाण ठरवा
- जेवणाचं प्रमाण ठरवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या
- मुलाच्या तोंडात जेवण जबरदस्ती कोंबू नका
- बाळाला किती भूक आहे हे समजून जेवण भरवा 

नॉर्वे युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी या संस्थेने केलेल्या सर्व्हेक्षात धक्कादायक निष्कर्ष समोर आलेत. मुलांना किती जेवायला द्यायचे याचे प्रमाण ठरवा. जेवणाचे प्रमाण ठरवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. मुलाच्या तोंडात जबरदस्ती जेवण कोंबू नका. त्याला किती भूक आहे हे समजून जेवण भरवा. 

बाळाला सकस आहार देण्याबाबत जेवढा कटाक्ष ठेवाल. तेवढेच बाळाला किती जेवायला द्यायचे याकडेही लक्ष द्या. अन्यथा तुमचे लाडाकोडाने भरवण्याची किंमत बाळाला त्याच्या आयुष्यभर मोजावी लागेल.