नियमित किमान एक लसणाची पाकळी खाल्ल्याने पुरूषांना होतात हे '7' चमत्कारिक फायदे

लसूण हा भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये हमखास आढळणारा मसाल्याचा पदार्थ आहे.

Updated: Apr 29, 2018, 08:14 AM IST
नियमित किमान एक लसणाची पाकळी खाल्ल्याने पुरूषांना होतात हे '7' चमत्कारिक फायदे title=

 मुंबई : लसूण हा भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये हमखास आढळणारा मसाल्याचा पदार्थ आहे. लसणामुळे जेवणाची लज्जत वाढते सोबतच त्याचा नियमित आहारात समावेश केल्याने आरोग्याच्याही अनेक समस्या दूर करण्यास मदत होते. लसणामध्ये अ‍ॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने अनेक इंन्फेक्शनचा त्रास कमी करण्यास मदत होते. लसणाइतकीच लसणाची सालदेखील फायदेशीर आहे त्यामुळे लसणाचा आहारात समावेश करताना त्याचाही उपयोग करायला मूळीच विसरू नका. 

लसणाचे पुरूषांना होतात हे खास फायदे -  

लसणामध्ये सेलेनियम घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे इन्फर्टिलिटीचा धोका कमी होण्यास मदत होता. 
लसणातील अ‍ॅन्टी बॅक्टेरियल गुणधर्म श्वासाला आणि तोंडाला येणार्‍या दुर्गंधीच्या समस्येला कमी करण्यास मदत करतात. महिला पुरूषांकडे अधिक आकर्षित होतात.
लसणामध्ये प्रोटीन घटक असतात. यामुळे मसल्स टोन्ड होण्यास मदत होते. 
लसणातील कार्बोहायड्रेट्स शरीरातील शीण,थकवा दूर करण्यास मदत करतात. यामुळे शरीराला एनर्जी मिळण्यास मदत होते. 
लसणातील कॅल्शियम घटक हाडांना मजबूत करण्यास मदत करतात. 
लसणामध्ये एलिसिन घटक मुबलक प्रमाणात आढळत असल्याने फॅट बर्न करण्यास मदत होते. यामुळे वजन आटोक्यात ठेवण्यासही मदत होते. 
लसणामधील फायबर्स घटक बद्धकोष्ठता, पचनाचे विकार कमी करण्यास मदत करतात.

का खावे लसूण ?

लसूण शरीराची प्रतिकार शक्ती वाढते. कर्करोग सारख्या गंभीर रोग लढण्यासाठी मदत करते.

वैद्यकीयदृष्ट्या कोलोस्ट्रोल कमी करण्यास मदत करते. स्तनाचा आणि कर्करोग कमी करण्यासाठी लसूणीच्या कच्च्या पाकळ्या खाणे केव्हाही चांगल्या.

शरीरातील टी-सेल्स, फॅगोसाईट्स, लिंफोसाई्टस आदी प्रतिरोधक तत्व वाढवण्यास लसूण मदत करते. प्रतिरोधक घटक आरोहित आणि शरीराची प्रतिकार वाढविण्यासाठी लसूण महत्वाची भूमिका बजावते. वाढता रक्तदाब नियंत्रणात आणण्यात लसूण उपयोगी ठरते.

लसूण खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. आपले हृदय नेहमी तंदुरुस्त ठेवण्यास लसूण मदत करते. शरीरात वाढणार कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल पातळी दूर करणे सोपे आहे