मुंबई : आजकाल लाईफस्टाईलमध्ये झालेल्या बदलांमुळे कळत नकळत आपणच काही आजारांना आमंत्रण दिलं आहे. वेळीच या समस्या आटोक्यात न ठेवल्यास त्रास अधिक बळावण्याची शक्यता असते. सुरूवातीच्या टप्प्यामध्ये लहान वाटणार्या या आजारांना आटोक्यात ठेवण्यासाठी दूधामध्ये खसखस मिसळून पिणं फायदेशीर आहे. उन्हाळा आणि हिवाळ्यामध्येही खसखस आणि दूधाचे मिश्रण पिणं आरोग्याला फायदेशीर आहे. खसखसीमध्ये ओमेगा 3, ओमेगा 6 फॅटी अॅसिड आढळतात. सोबतच फॅटी अॅसिड, प्रोटीन, फायबर, थायमिन, कॅल्शियम घटक मुबलक असतात.
खसखस आणि दूध प्यायल्याने सर्दी खोकल्याचा त्रास आटोक्यात राहतो.
खसखस दूधामधील ओमेगा 3 फॅटी अॅसिड वजन आटोक्यात ठेवण्यास मदत करते.
हे दूध नैसर्गिक पेनकिलर असल्याने वेदना, अंगदुखी कमी करण्यास मदत करते.
बद्धकोष्ठतेचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी खसखस दूधाचे मिश्रण फायदेशीर ठरते.
उच्च रक्तदाबाचा त्रासही आटोक्यात ठेवण्यासाठी हे दूध फायदेशीर ठरते.
शरीरातील रक्ताची कमतरता नियंत्रणात ठेवण्यासाठी हे दूध मदत करते.