तरुणांनो ही बातमी तुमच्यासाठी, केव्हाही होता येणार तरूण, आता टेन्शन संपलं!

Research Science News: एखाद्या प्रयोगाला मान्यता मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तो प्रयोग यशस्वी होण्याची आवश्यकता असते. हार्वर्ड आणि बोस्टनमधला प्रयोग वर्षभर चालला आणि यशस्वीही झाला. 

Updated: Jan 18, 2023, 11:40 PM IST
तरुणांनो ही बातमी तुमच्यासाठी, केव्हाही होता येणार तरूण, आता टेन्शन संपलं! title=
old become young

Science News: तरुणांनो ही बातमी तुमच्यासाठी, केव्हाही होता येणार तरूण, तुम्हाला तरुण बनवण्याचा दावा करणाऱ्या शेकडो क्रिम्स किंवा टॅबलेट्स बाजारात आहेत. मात्र, आता तुम्हाला तरुण करणारं संशोधन यशस्वी झालंय. ज्यामुळे तुमचं वय वाढणार नाही. म्हणजे 60 वर्षांचा म्हातारा आता अचानक 30 वर्षांचा दिसायला लागेल. वृद्धांना तरुण बनवणारं संशोधन हार्वर्ड आणि बोस्टन विद्यापीठात यशस्वी झालंय. (Harvard and Boston University conducted research that Will the old become young marathi news)

हार्वर्ड आणि बोस्टन विद्यापीठात (Harvard and Boston University) म्हाताऱ्यांना तरुण करणारं संशोधन झालं. कमजोर नजर आणि म्हाताऱ्या उंदरांवर प्रयोग करण्यात आलं. म्हाताऱ्या उंदरांमध्ये तरुण मानवी त्वचेच्या पेशी सोडण्यात आल्या. काही दिवसातच म्हातारे तरुण आणि तंदुरुस्त झाले. मेंदू, स्नायू आणि किडनीतल्या पेशींवरही हा प्रयोग यशस्वी ठरला आहे.

उंदरांवर हा प्रयोग पूर्णपणे यशस्वी ठरलाय. म्हातारे उंदीर तरुण बनले. हा प्रयोग उलट्या दिशेनंही शक्य आहे म्हणजे तरुण उंदरांना म्हातारं करण्यातही शास्त्रज्ञांना यश आलंय. शरीरात युवा अवस्थेची बॅकअप सिस्टीम असते या निष्कर्षापर्यंत शास्त्रज्ञ पोहचले आहेत. त्यामुळे अनेकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

आणखी वाचा - Maruti Suzuki ला एक चूक भोवली! 17 हजाराहून अधिक गाड्या परत मागवल्या

दरम्यान, एखाद्या प्रयोगाला मान्यता मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तो प्रयोग यशस्वी होण्याची आवश्यकता असते. हार्वर्ड आणि बोस्टनमधला प्रयोग वर्षभर चालला आणि यशस्वीही झाला. मात्र या संशोधनात प्रयोग करण्यात आलेल्या उंदरांची संख्या फारच कमी होती. त्यामुळे हा प्रयोग माणसांवरही तितक्याच प्रमाणात यशस्वी होईल याबाबत मात्र अजूनही शास्त्रज्ञांना साशंकता आहे.