Side Effects Of Drinking Hot Water: सामान्यपणे हिवाळ्यामध्ये (Winter Health Tips) अनेकजण गरम पाणी (Hot Water) पिण्यास प्राधान्य देतात. त्यातही सध्या घसा आणि खोकल्यासंदर्भातील (Viral Health Issues) साथ असल्याने प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर (precaution is better than cure) म्हणजेच आजारी पडून काळजी घेण्याऐवजी आजारी पडूच नये अशी काळजी घेण्याच्या दृष्टीने गरम पाणी पिणाऱ्यांची संख्या वाढल्याचं चित्र दिसत आहे. निरोगी आणि ठणठणीत राहण्याच्या उद्देशाने अनेकजण गरम पाण्याला प्राधान्य देतात. असं केल्याने व्हायरल संसर्गापासून (Viral Infection) आपण दूर राहू असा अनेकांचा समज असतो. मात्र गरजेपेक्षा अधिक गरम पाणी प्यायल्याने प्रकृतीवर विपरित परिणाम (Health Issues) होऊ शकतो हे अनेकांना ठाऊक नसतं. वैज्ञानिकांनी केलेल्या एका संशोधनामध्ये गरजेपेक्षा अधिक गरम पाणी पिणं आरोग्यासाठी फायद्याचं नसतं असा निष्कर्ष काढला आहे. सातत्याने गरम पाणी प्यायल्याने प्रकृतीसंदर्भातील समस्या उद्भवू शकतात. गरम पाण्यामुळे कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात, नेमकं काय होतं जास्त गरम पाणी प्यायाल्याने जाणून घेऊयात यासंदर्भातील सविस्तर माहिती...
इंटरनल ऑर्गन्ससाठी धोकादायक (Harmful For Internal Organs)
'स्टाइलक्रेज' या आरोग्यविषय वेबसाईटनुसार गरम पाण्याचं सेवन केल्याने शरीराच्या अवयवांना दुखापत होऊ शकते. शरीराच्या अंतर्गत भागातील अवयवांना गरम पाण्यामुळे हानी पोहचू शकते ज्यामधून पुढे अधिक क्लिष्ट समस्या निर्माण होऊ शकतात. त्वचेवरील पेशी (स्कीन टिश्यू) सातत्याने जास्त गरम पाण्याच्या संपर्कात आल्यास त्याचा विपरित परिणाम होतो. अशा पेशी खराब होण्याची शक्यता असते. अशाप्रकारचं एक प्रकरणही समोर आलं होतं. 61 वर्षीय व्यक्तीला गरम पाणी प्यायलाने लैरींगोफरीनक्स एडिमा ही व्याधी झाली होती. यामध्ये श्वसन यंत्रणा काम करायचं बंद होतं आणि श्वास घेण्यास त्रास होतो. हा त्रास सुरु झाला की तो हळूहळू कळतो आणि श्वास कमी पडू लागतो. श्वास कमी पडू लागल्यानंतर सहा ते 24 तासांमध्ये त्रास अधिक गंभीर स्वरुप धारण करतो. यानंतर व्यक्तीला रुग्णालयामध्ये दाखल करण्याशिवाय पर्याय शिल्लक राहत नाही.
पाण्याचा स्त्रोत स्वच्छ असणे आवश्यक (Water Source)
जर घरामध्ये पाणी गरम करण्यासाठी बॉयलरचा वापर होत असेल तर असं पाणी धातूच्या कणांच्या संपर्कात आलेलं असतं. त्यामुळे हे गरम पाणी पचायला अधिक जड असतं असं सांगितलं जातं. तसेच हे गरम केलेलं पाणी स्वच्छ नसेल तर त्यामधील घटकांची या धातूशी प्रक्रिया होऊ शकते. त्यामुळेच पाण्याचा स्त्रोत हा स्वच्छ असेल याची काळजी घेणं आवश्यक असतं. स्टीलच्या भांड्यांमध्ये पाणी गरम करणं हा यावरील सर्वात सोपा उपाय आहे.
पाणी गरम करताना या गोष्टी लक्षात ठेवा (Water Boiling Tips)
> पाणी गरम करताना ते उकळून घेण्याऐवजी केवळ गरम करुन घ्यावं.
> उकळण्याऐवजी पाणी गरम केल्याने त्यामुळे शरीराच्या आतील अवयवांना हानी पोहण्याचा धोका कमी असतो.
> रुम टेम्प्रेचर म्हणजेच आजूबाजूच्या वातावरणापेक्षा थोडं अधिक तापमान असणारं पाणी हे गरम पाणी म्हणून सेवन करणं अधिक फायद्याचं ठरतं.
> पाण्याचा फिल्टर वापरण्याचा पर्याय दुषित पाण्याच्या समस्येवर चांगला उपाय ठरु शकतो.