मुंबई : उशीवर डोकं ठेवलं म्हणजे दिवसभरातील सारा थकवा, त्रास दूर झाल्यासारखा वाटतो. अनेकांना उशीशिवाय झोपच येत नाही. उशीला घट्ट मिठी मारून झोपल्यानंतर अनेकांना शांत वाटते. पण तुम्हांला ठाऊक आहे का? उशीमुळेच काही आजारांचा धोका बळावण्याची शक्यता अधिक असते. लहान वाटणार्या तुमच्या आयुष्यातील आजारांना उशीच आमंत्रण देत असते हे तुम्हांला ठाऊक आहे का?
उशीमुळे वाढतात 'या' समस्या -
मानेचं दुखणं -
उशीचा आकार, उंची आणि स्थिती योग्य नसेल तर त्यामुळे मानेचे दुखणे वाढते. 7-8 तास अशाच स्थितीत झोपल्याने मानेचे दुखणे वाढते. सकाळी अशाप्रकारचे दुखणे घेऊन उठल्याने सारा दिवस बिघडण्याची शक्यता असते.
अकाली सुरकुत्या -
पोटावर किंवा कुशीवर झोपल्याने चेहर्यावरील त्वचा आणि उशी यांमध्ये घर्षण होते. परिणामी त्वचेचा पोत बिघडतो. अकाली चेहर्यावर सुरकुत्या येणं, चेहरा निस्तेज दिसणं अशा समस्या वाढतात.
छुपे कीटाणू -
उशीवर धूळ असल्याने चेहर्यावरील तेल आणि उशीवर घाण, त्यावर वाढणाअरे जंतू यामुळे त्वचेचं नुकसान होते. चेहर्यावर पिंपल्सचा त्रास वाढण्यामागे हे एक प्रमुख कारण ठरते.
अॅलर्जी -
त्वचेवर अॅलर्जी वाढण्यामागेदेखील उशीची अस्वच्छ कव्हरं कारणीभूत ठरू शकतात. उशीची कव्हरं वेळच्या वेळी धुतलेली नसल्यास, त्यावरील केमिकलयुक्त रंग यामुळेही काहींना अॅलर्जीचा त्रास होतो.
केसगळती -
केस नीट बांधलेले नसल्यास झोपेत ते उशीवर घासले जातात. परिणामी ते तुटण्याचे, कमजोर होण्याची शक्यता अधिक असते. सोबतच उशी टाळूवरील मॉईश्चर कमी होऊ शकते. केसगळतीच्या समस्येमागे तुमच्या या '7' चूका कारणीभूत