सतत सर्दी होणं देते 'या' गंभीर आजाराचे संकेत

काही वेळेस वातावरणात बदल झाल्यावर, अ‍ॅलर्जीमुळे किंवा शरीराची रोगप्रतिकारक्षमता कमी झाल्यानंतर सर्दी, खोकल्याचा त्रास बळावतो.

Updated: May 19, 2018, 09:22 PM IST
सतत सर्दी होणं देते 'या' गंभीर आजाराचे संकेत  title=

 मुंबई : काही वेळेस वातावरणात बदल झाल्यावर, अ‍ॅलर्जीमुळे किंवा शरीराची रोगप्रतिकारक्षमता कमी झाल्यानंतर सर्दी, खोकल्याचा त्रास बळावतो. मात्र तुम्हांला सतत सर्दीचा त्रास होत असल्यास याकडे दुर्लक्ष करू नका. सतत सर्दी होणं हे एका गंभीर आजाराचं लक्षण आहे. त्यामुळे याकडे मूळीच करू नका.  

कोणत्या आजाराचा धोका? 

सतत सर्दी होणं हे आरोग्यासाठी चांगलं नाही. सर्दी होणं, नाक बंद राहणं, डोकं जड होणं, नाकातून सतत पाणी वाहणं ही लक्षण सामान्य वाटतात. मात्र या गोष्टीमुळे काही गंभीर आजाराचा धोका वाढत असल्याचेही संकेत मिळतात. हे 'सायनोसायटीस'चा देखील धोका असु शकतात.उन्हाळ्यात सर्दीचा त्रास दूर करेल हे घरगुती उपाय

कशामुळे वाढतो हा धोका? 

आजकाल वाढत्या प्रदुषणामुळे अनेकांना अ‍ॅलर्जी होण्याचं प्रमाण वाढलं आहे. नाक चोंदून बंद होते. नाकामध्ये सर्दी भरून राहते. यामुळे डोकं जड होणं, घसा, गळा, जबड्याचा वरचा भाग यामध्ये वेदना होतात. 
 
डोक्यामध्ये धूळ, प्रदूषणाद्वारा येणारी दुषित हवा रोखण्याची क्षमता असते.जेव्हा सायनसचा रस्ता बंद होतो तेव्हा श्वासावाटे आत आलेली घाण 'सायनोसायटिस'चा धोका वाढवतात. यामुळे शरीराची उर्जा कमी होते. झोप कमी होते. गंध ओळखण्याची क्षमता, स्वाद घेण्याची क्षमता कमी होते. परिणामी श्वास घेण्यामध्येही त्रास होतो.  

 लहान मुलांमध्ये हा त्रास अ‍ॅलर्जीमुळे किंवा बॉटलमधून दूध पिण्याच्या सवयीमुळे होऊ शकतो. घरात एखादी व्यक्ती धुम्रपान करत असल्यास त्याद्वारादेखील मुलांमध्ये इंफेक्शन वाढते.  

 काय होतात बदल?  

 आवाजात बदल होणं, डोकं दुखणं, डोकं जड होणं, गळ्यात कफ जमा होणं, ताप / कणकण जाणवणं, दातदुखी, चेहर्‍यावर सूज अशी लक्षण जाणवतात. त्यामुळे तुम्हांला हा त्रास जाणवत असल्यास वेळीच 'सायनोसायटिस'चा धोका ओळखा. 

 कशी घ्याल काळजी?  

नियमित 8-10 ग्लास पाणी पिण्याची सवय असायलाच पाहिजे. सकाळी गरम चहा किंवा पाणी प्या. 

स्विमिंग करताना काळजी घ्या. पाण्यात क्लोरिनचा वापर करा. 

हातांना साबणाने स्वच्छ धुवावे. 

मीठाच्या पाण्याने नाक  स्वच्छ करा. 
 
 वायुप्रदुषणापासून दूर रहा. घरामध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्या. 
 
 घरामध्ये बिछाने, उशी, पायपुसणी स्वच्छ ठेवा. 
 
 परफ्युमपासून दूर रहा.