केस गळणे थांबत नसेल तर करा 'या' तेलाचा वापर; फायदा झालाच म्हणून समजा

तेल लावल्याने केस गळणे थांबते आणि नवीन केसही वाढू लागतात

Updated: Jul 28, 2022, 02:33 PM IST
 केस गळणे थांबत नसेल तर करा 'या' तेलाचा वापर; फायदा झालाच म्हणून समजा   title=

HAIR LOSS TIPS: केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे. विशेषतः पावसाळ्यात केस खूप कमकुवत होऊन गळू लागतात. अशा परिस्थितीत, प्रत्येकजण केस गळणे टाळण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी उपाय शोधतो.  बरं, 

केस गळण्याची अनेक कारणं 

ज्यामध्ये खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, केसांची नीट स्वच्छता न करणे ही कारणं महत्वाची आहेत.  
केसगळतीच्या समस्येवर मात करण्यासाठी केसांना तेल लावणं महत्वाच आहे. ते खूप आवश्यक,खूप फायदेशीर आहेत. तेल लावल्याने केस गळणे थांबते आणि नवीन केसही वाढू लागतात.  
चला तर मग जाणून घेऊया कोणते  ऑइल वापरुन या समस्येवर मात करु शकतो.

रोझमेरी तेल

केस अत्यंत कमकुवत आणि मुळांपासून पातळ असल्यास.  आणि ते तुटत असल्यास केसांना रोझमेरी तेल लावत जा.  या तेलाच्या मदतीने केसांची वाढ होते आणि ते निरोगी राहतात. त्यामुळे केसही दाट होतात.
कसे लावावे
केसांना रोझमेरी तेल लावण्यासाठी ते खोबरेल तेलात मिसळा. अर्धा चमचा खोबरेल तेलात रोझमेरी तेलाचे ५-७ थेंब मिसळा. नंतर ते स्काल्पवर लावा आणि सुमारे अर्धा तास राहू द्या. नंतर केस शाम्पूने धुवा. याचा परिणाम केसांवर लवकरच दिसून येईल.

 लेमनग्रास तेल

 केसांमध्ये कोंडा जास्त असेल आणि केस गळत असतील तर केसांना लेमनग्रास तेल लावा.  कधी-कधी केसांमध्ये कोंड्याची समस्या देखील जास्त प्रमाणात असते त्यामुळे केस गळण्यास सुरुवीत होते .  लेमनग्रास तेल स्काल्पचा कोरडेपणा दूर करते.  ज्यामुळे कोंडा संपतो. कोणत्याही शैम्पूमध्ये लेमनग्रास तेलाचे 4-5 थेंब मिसळा.

चंदन तेल

केस खूप तेलकट आणि चिकट असल्यास केस गळतात, तर चंदनाचे तेल लावल्याने फायदा होऊ शकतो. हे स्काल्पवरील तेल-उत्पादक ग्रंथींचे संतुलन राखण्यास मदत करते.  त्यामुळे केसांमधील खाज, कोंडा आणि चिकटपणापासून आराम मिळतो.  ते लावण्यासाठी खोबरेल किंवा एरंडेल तेलात चंदनाच्या तेलाचे 3-4 थेंब मिसळा आणि स्काल्पवर  लावा.