केस गळती रोखण्यासाठी योग्य आहार

प्रत्येकाला केस गळण्याची समस्या आहे, केस गळतीमागे अनेक कारणं आहेत, यात आहार हे मुख्य कारण आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 27, 2018, 11:30 PM IST
केस गळती रोखण्यासाठी योग्य आहार title=

मुंबई : प्रत्येकाला केस गळण्याची समस्या आहे, केस गळतीमागे अनेक कारणं आहेत, यात आहार हे मुख्य कारण आहे, असंतुलित आहारामुळे केस गळण्याचं प्रमाण वाढतं, केस गळणं ही समस्या सर्वांसमोरच आ वासून उभी असते. 

शरीरातील हार्मोन्समध्ये होणारे बदल

क्षारयुक्त पाण्याचा वापर, शरीरातील हार्मोन्समध्ये होणारे बदल, पित्तदोष, प्रदूषण तसेच अनुवांशिकता ही देखील कारणं आहेत, तर पाहुया कोण कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश झाला, म्हणजे केस गळती कमी होईल.

आहारात या पदार्थांचा समावेश करा

रताळे

रताळे हे केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. रताळ्यामध्ये बीटा कॅरोटीनचे प्रमाण अधिक असते. 

पालक

केसांच्या विकासासाठी पालक फारच फायदेशीर असते. कारण पालकाच्या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. 

अंडी

अंड्याच्या सेवनासोबत अंड्यांचा बल्क ऑलिव्ह ऑईलमध्ये मिसळून लावल्याने केसांचे आरोग्य सुधारते. हे मिश्रण लावल्याने डोक्यातील कोंडा निघून जाण्यास मदत होते. म्हणून केसांच्या विकासासाठी अंडी अत्यंत उपयोगी असतात. 

ढोबळी मिरची

क जीवनसत्व हे केसांच्या आरोग्यासाठी फार चांगले असते. क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे केस कोरडे पडण्याची शक्यता असते. तसेच ढोबळी मिरचीमध्ये क जीवनसत्वाचे प्रमाण भरपूर असते.