...या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतो मनासारखा पार्टनर

मनासारखा पार्टनर मिळावा ही इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. पण तो मिळणर कसा? कारण त्याचे विशेष असे काही ठोकताळे नसतात. म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगतोय अशी खास ठिकाणे. जिथे तुम्हाला मिळू शकेल मनासारखा पार्टनर...

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Sep 13, 2017, 11:34 PM IST
...या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतो मनासारखा पार्टनर title=

मुंबई : मनासारखा पार्टनर मिळावा ही इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. पण तो मिळणर कसा? कारण त्याचे विशेष असे काही ठोकताळे नसतात. म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगतोय अशी खास ठिकाणे. जिथे तुम्हाला मिळू शकेल मनासारखा पार्टनर...

कॉलेज / स्कूल

कॉलेज आणि स्कूल ही अशी ठिकाणे आहेत. जेथे एकमेकांचे आकर्षण पटकण वाढते. कारण अशा ठिकाणी अनेक स्वभाव एकत्र येत असतात. अभ्यास, चर्चा, खेळ, मैत्री अशा एक ना अनेक कारणांमुळे एकमेकांना जाणून घेणे. विचारांची देवाण घेवाण सहज शक्य होते. यातून समविचारी व्यक्तीशी नाते जोडणे फार अवघड असत नाही.

ट्रेन

अनेकांच्या प्रेमाची सुरूवात ट्रेनमधूनच झाली आहे. विशेष म्हणजे याचा प्रभाव आपणास बॉलिवूडमध्ये जास्त प्रमाणात पहायला मिळतो. खरेतर प्रवासात कोणाची तरी सोबत असणे खूप महत्त्वाचे वाटते. तुम्ही जर एकटे प्रवास करत असाल. तर प्रवास कंटाळवाणा होण्याची शक्यता असते. म्हणून प्रवासात सहप्रवाशांशी गप्पा मारा यातूनही तुमच्या मनासारखा एखादा जोडीदार तुम्हाला भेटू शकतो.

समाज माध्यमे (सोशल मीडिया)

आजचा जमाना हा इंटरनेटचा आहे. त्यातही युवकांचा जास्त वावर असणाऱ्या फेसबूक, व्हाट्स एप, ट्विटर यांसारख्या सोशल माध्यमांचा सोशल माध्यमातूनही तुमची अनेकांशी मैत्री होणे सोपे जाते. या मैत्रिचे रूपांतर प्रेमात आणि पूढे बंधनात झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. आपल्या बाबतीतही ही शक्यता नाकारता येत नाही. मात्र, समाजमाध्यमातून मैत्री बनवताना सावधान. यात अनेकदा फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे सावधानतेनेच संबंध प्रस्थापीत करा.

लग्नसमारंभ, पार्टी, सांस्कृतीक कार्यक्रम

या ठिकाणी तुम्हाला इतर कोणत्याच ठिकाणी पाहता येणार नाही, अशा स्वरूपात तुमचा पार्टनर पहायला मिळू शकतो. फक्त गरज असते ती शोधक नजरेची. अशा कार्यक्रमांमध्ये पार्टनर आकर्षक पोषाख आणि उत्साही असतो. त्यामुळे त्याच्या स्वभाव सवयी यांचा अदाज घेता येतो. तसेच अनेकाशी आपल्या ओळखी होतात. त्यामुळे आपणास चॉईसही राहतो.

जिम

हा प्रकार थोड स्वप्नाळू आहे. पण नाकारता येण्यासारखाही नाही. हा प्रकार फिल्मी स्टाईल वाटला तरी, जिममध्ये ट्रेनिंग देण्यासाठी  व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या अनेक मित्र, मैत्रिणींपैकी व ज्याच्याशी तुमचे चांगले ट्यूनिंग जमू शकते, अशा व्यक्तीचा विचार करायला काय हरकत आहे.