'राजांचा आजार'मुळे कमी वयात होऊ शकतो 'हा' त्रास; धोका वाढण्यापूर्वी लक्षणे ओळखा

पबमेडनुसार 'राजांचा आजार' किंवा 'श्रीमंत माणसाचा आजार' यामुळेही आपल्याला गुडघेदुखी होऊ शकते. 

Updated: Aug 1, 2022, 06:20 PM IST
 'राजांचा आजार'मुळे कमी वयात होऊ शकतो 'हा' त्रास; धोका वाढण्यापूर्वी लक्षणे ओळखा  title=

Knee Pain: बदललेली जीवनशैली आणि धावपळीच्या जगात लोकांना अनेक आजारांने आज गाठलं आहे. बाहेरचे खाद्यपदार्थांवर भडीमार केल्यामुळे लहान वयात अनेक आजारांनी लोकांना विळखा घातला आहे. जे आजार अगदी म्हातारपणी दिसून येत होते ते आजकाल कमी वयात झालेले आढळून येत आहे. संशोधनानुसार आजकाल प्रत्येकी 100 पैकी 2 जणांना संधिवाताचा त्रास दिसून येतो. डॉक्टर सांगतात की, आजकाल 30 वर्षांच्या तरुणांमध्येही संधिवाताची समस्या दिसून येत आहे. या संधिवातामुळे कमी वयात गुडघेदुखीची तक्रार वाढली आहे. गुडघेदुखी मागे वेगवेगळीही कारणे असू शकतात. मात्र या गुडघेदुखीमागे 'किंग्ज डिसीज' हा देखील असू शकतो. 

'किंग्ज डिसीज' म्हणजे राजांचा आराज 

पबमेडनुसार 'राजांचा आजार' किंवा 'श्रीमंत माणसाचा आजार' यामुळेही आपल्याला गुडघेदुखी होऊ शकते. या गाउट असंही म्हटलं जातं. या गाउटबद्दल पूर्व इजिप्तमध्ये 2600 ईसामध्ये काही जुनी कागदपत्रं सापडली होती. 
2640 बीसी मध्ये इजिप्शियन लोकांनी पहिल्यांदा हा आजार ओळखला होता. त्यानंतर पाचव्या शतकात ग्रीक चिकित्सक हिप्पोक्रेट्सने या आजाराबद्दल पुष्टी दिली होती.  गाउट हा लॅटिन शब्द असून हा Gutta या शब्दापासून आला आहे. श्रीमंतांचा आजार असं का म्हणतात, तर पूर्वी अनहेल्दी फूड आणि दारु हे श्रीमंतामध्ये मोठ्या प्रमाणात सेवन केलं जातं होतं. या परिणाम त्यांना संधिवाताची समस्या दिसून येत होती. 

 

गाउट हा संधिवाताचा एक प्रकार आहे. या आजारात तुमच्या सांध्यामध्ये सोडियम युरेटचे स्फटिक तयार होऊ लागतं. त्यामुळे तुम्हाला तीव्र वेदना होता आणि त्या भागात सूज पण येते. साधारण पायाचा सांधा. घोट्याचा सांधा आणि गुडघ्याच्या सांध्यावर याचा परिणाम दिसून येतो. आता हा श्रीमंतांचा आजार सामान्य लोकांनाही होताना दिसून येत आहे. ज्याच्या आहारात अल्कोहोल, रेड मीट, ऑर्गन फूड आणि सीफूडचा समावेश आहेत त्यांना हा त्रास होऊ शकतो.  नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या मते, गाउट सध्या 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांना आणि रजोनिवृत्तीनंतर महिलांना खास करु दिसून येतो.

काय आहेत या रोगाची लक्षणं?

अचानक सांधेदुखी
पायाचे बोट दुखणे
हात, मनगट, कोपर किंवा गुडघेदुखी
सांध्यावर सूज येणे
वेदनादायक सांध्यावर सूज येणे
सांधेदुखीसह ताप
सांधेदुखीसह थंडी वाजणे

संधिरोगाची कारणं 

जास्त वय
लठ्ठपणा
प्युरिन आहार
दारू
गोड पेय
सोडा
फ्रक्टोज कॉर्न सिरप

अशी लक्षणं दिसल्यास?

जर तुम्हाला अशी लक्षणं दिसली तर वेळीच डॉक्टरांकडे जा आणि वेळीच काळजी घ्या. अन्यथा हा आजार गंभीर संधिरोगाकडे वळू शकतो. या आजाराकडे दुर्लक्ष करु नका. 

 (Disclaimer : येथे दिलेली माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)