ऐन तारुण्यात तुमचेही केस झालेत का पांढरे ? घरच्या घरी करा हा उपाय पुन्हा मिळतील काळेभोर केस

केमिकलयुक्त हेअर डाई वापरत असाल तर केसांमध्ये कोरडेपणा येऊ शकतो

Updated: Jul 23, 2022, 03:28 PM IST
 ऐन तारुण्यात तुमचेही केस झालेत का पांढरे ? घरच्या घरी करा हा उपाय पुन्हा मिळतील काळेभोर केस title=

white hair problem :  ऐन तारुण्यात तुमचे केस पांढरे होताहेत का .खूप उपाय करून पाहिलेत पण काही फरकच पडत नाहीये तर हा उपाय एकदा करून पहा ..घरच्या घरी कुठलाही केमिकल न वापरता हा उपाय केल्याने तुमचे पांढरे केस काळे होण्यास मदत होईल 

तरुण वयात डोक्यावर केस पांढरे होणे ही आजकाल एक सामान्य गोष्ट झाली आहे, परंतु यामुळे तरुणांच्या मनात प्रचंड तणाव निर्माण होतो. पिकलेले केस  कमी आत्मविश्वासाचे कारण बनतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी जर तुम्ही केमिकलयुक्त हेअर डाई वापरत असाल तर केसांमध्ये कोरडेपणा येऊ शकतो, अशा परिस्थितीत तुम्ही एक खास गोष्ट वापरू शकता, ज्याचा प्रभाव काही दिवसातच दिसू लागतो.

चिंचेची पानं

जर वयाच्या 25 ते 30 व्या वर्षी तुमचे केस पिकू लागले असतील तर यासाठी चिंचेच्या पानांचा वापर केला जाऊ शकतो. त्यात जीवनसत्त्व आणि खनिजं भरपूर प्रमाणात असतात.  ते केसांना निरोगी बनवण्यास मदत करतातच, परंतु शरीराशी संबंधित अनेक समस्या त्यापासून दूर होऊ शकतात. केसांच्या बाबतीत त्याचे अँटी-डँड्रफ आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म खूप उपयुक्त आहेत.

चिंचेची पानं कशी वापरावी

केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही चिंचेच्या पानांचा हेअर पॅक तयार करू शकता किंवा त्याच्या मदतीने हेअर स्प्रे देखील बनवू शकता.

 1. स्प्रे तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात 5 कप पाणी घेऊन त्यात अर्धी वाटी चिंचेची पानं मिसळा. आता ते उकळवा आणि नंतर ते थंड होण्याची प्रतीक्षा करा आणि शेवटी केसांमध्ये फवारल्यानंतर काही वेळाने स्वच्छ पाण्याने धुवा.

 2. चिंचेच्या पानांचा हेअर पॅक तयार करण्यासाठी काही पानं दह्यासोबत मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्या, पेस्ट तयार झाल्यावर केसांना हळू हळू मसाज करून लावा.  ते कोरडे झाल्यानंतर, डोकं स्वच्छ पाण्याने धुवा.

 चिंचेची पानं का फायदेशीर आहेत?

 चिंचेच्या पानांमध्ये नैसर्गिक केस कलरिंग एजंट आढळतात, काही आठवडे वापरल्याने पांढरे केस पुन्हा काळे होतीलच पण केस गळणे, केस कोरडे पडणे, कमकुवत केस यांसारख्या समस्या दूर होतील.