Best Time To Eat Fruits : फळे कधी खावीत, योग्य वेळ कोणती? याचे फायदे जाणून घ्या

Best Time for Eating Fruits : आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फळे आणि भाज्या खा, असा सल्ला दिला जातो. त्यामुळे आपल्या शरीरासाठी फळे किती महत्त्वाची आहेत हे माहित आहे. परंतु आपल्यापैकी बहुतेकांना फळे खाण्याची योग्य वेळ माहितच नसते.  

Updated: Jan 25, 2023, 01:08 PM IST
Best Time To Eat Fruits : फळे कधी खावीत, योग्य वेळ कोणती? याचे फायदे जाणून घ्या   title=
Fruits Right Time

Best Time For Eating Fruits :  आरोग्य चांगले राहावे, असे वाटत असेल तर फळांना प्राधान्य दिले पाहिजे. फळे खाल्ल्याने आपल्याला चांगली ऊर्जा मिळते. (Health News) यासोबत फळे खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. फळांचे फायदे आपल्या सर्वांना माहीत आहेत. उपवास करताना फळे आपल्या ऊर्जेचा आधार देतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की इतके फायदे होऊनही जर फळे चुकीच्या वेळी खाल्ली गेली तर त्याचे काय परिणाम होतात. नसेल तर लगेच जाणून घ्या. (Health Tips)

Fruit Peels Benefits : या फळांच्या सालींमध्ये दडलाय पोषक घटकांचा खजिना, फेकून देण्यापूर्वी जाणून घ्या फायदे

प्रत्येक गोष्टीला एक कालमर्यादा असते. त्याचप्रमाणे खाद्यपदार्थासाठी आहे. तसेच फळांचे सेवन करण्याची वेळ असते. आपण कधीही फळे खाऊ शकत नाही. त्याचवेळी, प्रत्येक व्यक्तीचे शरीराचे विशिष्ट प्रकार आणि पचन प्रक्रिया असते. त्यामुळे काही लोकांसाठी सकाळी फळ खाणे त्रासदायक ठरु शकते. इतरांसाठी, नाश्त्यासोबत फळ खाणे अधिक फायदेशीर ठरु शकते.  त्यामुळे फळ खाण्यासाठी अचूक वेळ निवडली तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो.

सकाळी फळे खाणे योग्य की अयोग्य?

  • जर तुम्हाला अ‍ॅसिडिटी किंवा छातीत जळजळ होत असेल आणि सर्दी, खोकला, सायनुसायटिस, अ‍ॅलर्जी, दमा, खूप ताप, फुफ्फुसांमध्ये रक्तसंचय, ब्राँकायटिस, मधुमेह आणि वजन वाढणे यांसारख्या समस्या असतील तर सकाळी रिकाम्या पोटी फळे खाऊ नका.
  • जर तुमची पचनशक्ती कमजोर असेल आणि बद्धकोष्ठता, कोरडी त्वचा अशी समस्या असेल तर ती सुधारण्यासाठी फळे खा. फळे तुमच्या आतड्यातील बॅक्टेरिया वाढवतात आणि तुमच्या जठरासंबंधी रसांना उत्तेजित करतात.
  • फळे वेगळीच खावीत हे लक्षात ठेवावे. त्यासोबत कधीही भाज्या, दुग्धजन्य पदार्थ, तृणधान्ये आणि कडधान्ये किंवा मांस मिसळून खाऊ नका. कारण ते तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. तर सुक्या मेव्यांसोबत फळांचे सेवन करता येते. 
  • ज्या लोकांची पचनशक्ती मजबूत असते त्यांच्यासाठी सकाळी फळे खाणे फायदेशीर असते. वास्तविक सकाळी 7 ते 11 या वेळेत आपल्या शरीरात डिटॉक्सची प्रक्रिया सुरु असते. या दरम्यान फळांच्या सेवनाने ऊर्जा वाढते. 
  • बहुतेक फळांमध्ये भरपूर फायबर असते, त्यामुळे ते सहज पचतात. त्यामुळे फळांमध्ये नैसर्गिक शर्करा असल्यामुळे येणाऱ्या काही तासांत त्यांचे सकाळी सेवन केल्याने पचनक्रियेची गती वाढते.
  • असे सांगितले जाते की, तुम्ही जागे झाल्यानंतर लगेचच शरीराला नैसर्गिक फळांच्या साखरेची नितांत गरज असते. म्हणूनच सकाळी कॉफीऐवजी फळांची प्लेट हातात असावी आणि रात्री फळे खाणे टाळावे. 

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)