Health Benefits of Fruit Peels: फळ खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते हे आपल्याला माहित आहे. मात्र, फळांच्या सालीचा खूप फायदा असतो, हे अनेकांना माहित नसते. (Health News) त्यामुळे फळांच्या साली फेकून दिल्या जातात. फळांमध्ये भरपूर पोषक घटक असतात आणि ते आरोग्यासाठी अनेक फायदे देतात. त्याचप्रमाणे फळांच्या सालीमध्येही भरपूर पोषक तत्वांचा खजिना असतो. हा खजिना आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. आपण अनेकदा फळे खातो आणि त्याची साले फेकून देतो. आता या फळांची साल फेकून देऊ नका. त्याचे फायदे जाणून घ्या. (Health Infromation in Marathi)
टरबूजाच्या सालीमध्ये भरपूर पोषक असतात. त्यामुळे पोट भरते आणि भूक नियंत्रित ठेवण्याचे काम होते. टरबूजाची साल वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.
केळीच्या सालीमध्ये असलेले पोषक तत्व आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यामध्ये फायबर आणि अमिनो अॅसिड्स मुबलक प्रमाणात आढळतात. केळ्याची साल डोळ्यांसाठी फायदेशीर असते. ती खाल्ल्याने डोळ्यांचा संसर्ग दूर होतो.
काही लोक पेर अर्थात नाशपाती सोलून खातात. हे फळ सालीसह खाणे अधिक फायदेशीर ठरते. पेरच्या सालीमध्ये भरपूर फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात. हे पचनासाठी खूप फायदेशीर आहे.
चिकू खायला चविष्ट आहे. आरोग्यासाठीही ते फायदेशीर आहे. चिकूची साल देखील पोषक तत्वांनी परिपूर्ण असते. यामध्ये जीवनसत्त्वे, लोह आणि पोटॅशियमसारखे गुणधर्म असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. चिकूची साल सोबत खावी.
पेरु सालीशिवाय खाणे अजिबात योग्य नाही. याच्या सालीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात, ज्यामुळे आरोग्याला फायदा होतो. पेरु हे सालीसोबत खावे.
लिंबाच्या सालीमध्ये असलेले पोषक तत्व शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. लिंबाच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात. यामध्ये असलेले गुणधर्म कर्करोगापासून बचाव करण्यासही मदत करतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)