Healthy Drinks For Glowing Skin: तुम्ही दिवसभर जे खातात त्याचा थेट परिणाम तुमच्या स्किनवर पाहायला मिळतो. तुम्हाला नितळ त्वचा हवी असेल तर तुम्हाला योग्य डाएट फॉलो करणं गरजेचं आहे. चला, तर मग जाणून घेऊयात त्वचा नितळ ठेवण्यासाठी कोणत्या पेयांचा करावा वापर.
आरोग्यदायी शरीरासाठी 10 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. पाणी कमी पिण्याने शरीर डिहायड्रेट होतं, पाचन शक्तीही कमी होते. पाणी पिण्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. याचा थेट परिणाम त्वचेवर पाहायला मिळू शकतो. म्हणूनच डॉटर एका दिवसात किमान 8 ते 10 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला देतात.
सकाळी नाश्त्यात ऑरेंज म्हणजेच संत्र्याचा ज्यूस पिणे आरोग्यदायी असतं. याने यामध्ये व्हिटॅमिन C आणि व्हिटॅमिन E आढळतं. C आणि व्हिटॅमिन E त्वचेच्या पेशींची अत्यंत फायदेशीर असतं. सकाळी संत्र्याचा रस पिण्याने त्वचा नितळ होण्यास मदत होते.
ग्रीन टीमध्ये झिरो कॅलरी असतात. जर तुम्हाला नितळ त्वचा हवी असेल तर तुम्ही दुपारच्या वेळेत ग्रीन टीचं सेवन करू करू शकतात. ग्रीन टीमध्ये व्हिटॅमिन E आणि व्हिटॅमिन B2 देखील असतं. ग्रीन टीमुळे बॉडी डिटॉक्स होते, याने त्वचा नितळ होण्यास मदत होते.
डाळिंबाच्या दाण्यांमध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. याने तुमची त्वचा आरोग्यदायी राहते. डाळिंबाच्या दाण्यांचा रस पिण्याने डार्क स्पॉट्स आणि पिगमेंटेशन दूर होण्यास मदत होते.
( विशेष नोंद - वरील बातमी सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे, दैनंदिन जीवनात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा )
for glowing and flawless sking drink water orange juice green tea and lot of water