20 वर्ष एकंही ढेकर आला नाही; तपासणी केली तेव्हा समजलं...

अनेकदा जेव्हा ढेकर येत नाही, तेव्हा अस्वस्थता जाणवत राहते. 

Updated: Oct 5, 2021, 11:05 AM IST
20 वर्ष एकंही ढेकर आला नाही; तपासणी केली तेव्हा समजलं... title=

लंडन : ढेकर येणं ही सामान्य गोष्ट आहे. अनेकदा जेव्हा ढेकर येत नाही, तेव्हा अस्वस्थता जाणवत राहते. मग जर एखाद्या व्यक्तीला 20 वर्षांपासून ढेकर आला नसेल तर...हो ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत असं घडलंय. 

गेल्या 20 वर्षांपासून ब्रिटनमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला ढेकर आलेला नाही. म्हणजेच जवळजवळ दोन दशकांपासून त्याचं पोट भरलं नव्हतं. दरम्यान, आता त्या व्यक्तीने त्याच्या आजारावर उपचार केले आहेत. त्याचं आयुष्य सामान्य लोकांप्रमाणे होईल अशी अपेक्षा आहे.

ब्राऊन विचित्र आजाराने ग्रस्त

बीबीसीच्या अहवालानुसार, इंग्लंडच्या ग्रिम्सबीमध्ये राहणारा 35 वर्षीय फिल ब्राऊन एका विचित्र आजाराने ग्रस्त होते. गेल्या 20 वर्षात त्याला एकही ढेकर आला नव्हता. यामुळे त्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. 

ब्राऊनने सांगितलं की, तो लहान असताना त्याला ढेकर यायचे. पण नंतर अचानक ते येणं बंद झाले आणि गेल्या 20 वर्षात त्याला एकही ढेकर आला नाही.

फिललाही त्याच्या आजारामुळे पेच सहन करावा लागला. तो मित्रांसोबत बाहेर प्यायला किंवा खाण्यासाठी गेल्यावर त्याचं पोट फुगू लागायचं. त्याने अनेक डॉक्टरांना दाखवलं पण काही फायदा झाला नाही. डॉक्टरांनी त्याला सहसा आंबटपणा किंवा अपचनासाठी औषधं दिली. एके दिवशी अचानक त्याने सोशल मीडिया साईटवर ढेकर न येण्यासंबंधित एक पोस्ट पाहिली, त्यानंतर त्याला संपूर्ण प्रकरण समजलं.

काय आहे ही कंडीशन?

जेव्हा त्याने या कंडीशनबद्दल शोध घेतला, तेव्हा त्याला कळलं की, त्याच्या पोटात नाही तर घशात समस्या आहे. डॉक्टरांच्या मते, याला Retrograde Cricopharyngeus Dysfunction म्हणतात. 

या स्थितीत, घशाचे स्नायू रिलॅक्स होत नाही, ज्यामुळे तो घशातून गॅस बाहेर येण्यास प्रतिबंध होतो. त्याला या अवस्थेच्या उपचारांबद्दल देखील माहिती मिळाली आणि वेळ वाया न घालवता उपचार करून घेतले.

या उपचारांनंतर पहिल्या दोन आठवड्यांत, त्याला फक्त पाणी पिण्यास सांगितलं होतं, 4 आठवड्यांच्या आत त्याने व्यवस्थित खाणं पिणं सुरू केले आणि त्याला ढेकरही येऊ लागले. फिल ब्राउन म्हणाला, 'मला आशा आहे की मी आता सामान्य लोकांसारखे जगू शकेन. मला आता आराम वाटतोय'.