मधुमेह आहे तरी गोड खावसं वाटतं का? मग 'हे' पदार्थ पूर्ण करतील तुमची इच्छा

Blood Sugar Level: मधुमेह असणाऱ्या रुग्णांना कधीतरी गोड खाण्याची इच्छा होते. अशावेळी काय करावं, असा प्रश्न पडतो?

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 17, 2023, 05:45 PM IST
मधुमेह आहे तरी गोड खावसं वाटतं का? मग 'हे' पदार्थ पूर्ण करतील तुमची इच्छा title=
foods to reduce sugar cravings for diabetics

Sugar Cravings For Diabetics Patient: गोड पदार्थ (Sweet) हे भारतीयांच्या आवडीचे असतात. जेवणानंतर हमखास एखादा गोड पदार्थ खाल्ला जातो. साखर जास्त प्रमाणात घेत असताना गोड खाण्याची इच्छादेखील (Sugar Craving) वाढते. अशावेळी गोड खाण्याची सवय कमी करणे खूप कठिण होऊ जाते. आपले शरीर ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) नियंत्रित करण्यासाठी इन्सुलिन हार्मोन्स (Insulin Hormone) रिलीज करतं. इन्सुलिन अचानक वाढले तर शरिरातील उर्जा कमी करते. ज्यामुळं थकवा जाणवतो आणि गोड खाण्याची इच्छा होऊ शकते. (Sugar Cravings For Diabetics)

मधुमेह असलेल्या रुग्णांनी काय खावं?

मधुमेह असलेल्या रुग्णांना शुगर क्रेव्हिंग जास्त प्रमाणात होऊ शकते. शरीरात ब्लड शुगरची लेव्हल वाढल्यानेही क्रेविंग वाढू शकते. मात्र, गोड खाण्याचा मोह वेळीच टाळला नाहीत तर परिस्थिती बिघडू शकते. अशावेळी गोड खाण्याची इच्छा झाल्यास मधुमेहाच्या रुग्णांनी काय खावं, याची माहिती जाणून घेऊयात. 

या पदार्थांचा आहारात समावेश करावा

बेरीज- स्ट्रॉबेरी, रासबेरी, ब्लूबेरींमध्ये फायबर आणि अँटी ऑक्सीडेंट असतात. या फळांमुळं ब्लड शुगरची लेव्हल नियंत्रित ठेवण्यास मदत होते. तसंच, साखर खाण्याची व गोड खाण्याची इच्छा कमी होण्यास मदत होते. 

एवोकाडोः एवोकाडोमध्ये हेल्दी फॅट्स आणि फायबरसारखे गुणधर्म आढळतात. यामुळं ब्लड शुगर लेव्हल कमी करण्याबरोबरच शुगर क्रेव्हिंग कमी होण्यासही मदत होते. 

नट्सः बदाम, अक्रोड आणि पिस्तासारखे नट्स फायबर, हेल्दी फॅट आणि प्रोटीन असतात. ज्यामुळं शुगर क्रेव्हिंग तर कमी होतेच त्याचबरोबर पोटही भरलेले राहते. 

ग्रीक योगर्टः ग्रीक योगर्टमध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि मॅग्नीशियमसारखे मिनरल्स असतात. ज्यामुळं शुगर क्रेव्हिंग कमी होते. तसंच, पोटभरीसाठी चांगला पर्याय आहे. 

दालचिनीः दालचिनी ब्लड शुगरची लेव्हल नियंत्रित करण्यास मदत होते. सकाळी पाण्यात दालचिनीची पावडर टाकून प्यायल्यास मधुमेहाच्या रुग्णांना प्यायला दिल्यास फायदेशीर ठरु शकते. 

डार्क चॉकलेटः डार्क चॉकलेटमध्ये अँटी ऑक्सिडेंट्स आणि हेल्दी फॅट्स असतात ज्यामुळं शुगर क्रेव्हिंग कमी होते. तसंच, गोड खाण्याची इच्छादेखील कमी होते. 

पालकः पालकात आर्यरन आणि मॅग्निशियमसारखे व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. ज्यात शुगर क्रेव्हिंग कमी करण्याबरोबरच ब्लड शुगर नियंत्रित करण्यास मदत होते. 

रताळः रताळ्यात फायबर आणि व्हिटॅमिन असतात. ज्यामुळं शुगर क्रेविंग कमी करण्याबरोबरच ब्लड शुगरची लेव्हलही नियंत्रित करण्यास मदत होते.