उन्हाळ्यात स्वस्थ राहण्यासाठी आहारात या ५ पदार्थांचा समावेश करा!

 उन्हामुळे त्रस्त आहात? 

Updated: May 24, 2018, 08:54 AM IST
उन्हाळ्यात स्वस्थ राहण्यासाठी आहारात या ५ पदार्थांचा समावेश करा! title=

मुंबई : उन्हामुळे त्रस्त आहात? काही खाण्याची इच्छा होत नाही. पण डिहाइड्रेशनपासूनही सुरक्षित राहायचे आहे. खाणे-पिणे टाळल्याने शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते. त्यामुळे आहारात फळे, भाज्या, दही यांसारख्या पदार्थांचा समावेश करा. यामुळे तुम्ही डिहाइड्रेशन, त्वचेची अलर्जी, इंफेक्शन आणि त्याचबरोबर व्हिटॉमिन या पोषकतत्त्वांच्या कमतरतेमुळे उन्हापासून सुरक्षित राहु शकता. त्यामुळे उन्हाळ्यात फिट आणि स्वस्थ राहण्यासाठी या काही पदार्थांचा आहारात अवश्य समावेश करा.

टॉमेटो

टॉमेटोत अॅंटीऑक्सीडेंट्स आणि व्हिटॉमिन्स भरपूर प्रमाणात असतात. त्याचबरोबर यात लायकोपीनसारखे आवश्यक फायटोकेमिक्स असतात. ज्यामुळे जुने आजार विशेषतः कन्सर ठिक करण्यास मदत होते.

संत्र

संत्र पोटॅशियमने भरपूर असते. उन्हाळ्यात हे पोषकतत्त्व महत्त्वाचे असते. यात कमीत कमी ८०% पाणी असते. 

लिंबू पुदीन्याचे पाणी

लिंबू आणि पुदीन्याचे पाणी शरीरासाठी अद्भूत कार्य करते. लीव्हरच्या सफाईसाठी हे उत्तम ठरते. तर मेटाबॉलिज्म मजबूत करण्यासाठी याची मदत होते.

कलिंगड

कलिंगडामुळे हायड्रेट राहण्यास मदत होते. यात पाण्याचा अंश भरपूर असल्यामुळे पोट भरलेले राहते. त्याचबरोबर कलिंगडात लायकोपिन असते. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यापासून त्वचेचे संरक्षण होते.

दही

प्रोटीनयुक्त दही उन्हाळ्यात खाणे अतिशय फायदेशीर ठरते. दही खाल्याने पोट शांत राहते. त्यामुळे इतर नमकीन किंवा कॅलरीजयुक्त फूड खाणे टाळले जाते. तसंच दह्यातील प्रोबायोटिक बॅक्टेरियामुळे पचनतंत्र सुरळीत राहण्यास मदत होते.