वजन घटवण्यासाठी नाश्त्यामध्ये करा 'या' पदार्थांचा समावेश

वजन घटवणं ही अत्यंत आव्हानात्मक प्रकिया असते. वजन घटवण्यासाठी खाण्यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो. 

Updated: May 29, 2018, 07:15 AM IST
वजन घटवण्यासाठी नाश्त्यामध्ये करा 'या' पदार्थांचा समावेश  title=

मुंबई : वजन घटवणं ही अत्यंत आव्हानात्मक प्रकिया असते. वजन घटवण्यासाठी खाण्यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो. मात्र वजन घटवण्यसाठी उपासमार करण्यापेक्षा योग्य पदार्थांची निवड करणं गरजेचे आहे. वजन घटवायचे असले तरीही सकाळी पोटभर नाश्ता करणं आवश्यक आहे. याकरिता सकाळच्या नाश्तामध्ये कोणते पदार्थ खावेत हे नक्की जाणून घ्या. 

सकाळच्या नाश्त्यामध्ये कोणते पदार्थ खावेत ? 

योगर्टमधील प्रोटिन्समुळे तुम्ही सडपातळ राहण्यास मदत होते. योगर्ट खरेदी करताना साधे व नॉन-फॅट योगर्टचा पर्याय निवडावा.

अंडी ही प्रोटिन्सने परिपूर्ण असतात. यामुळे तुमचे स्नायू बळकट होतात व लवकर भूक लागत नाही.

बारीक होण्यासाठी ग्रेपफ्रूट सकाळी खावे. ग्रेपफ्रूट खाल्याने पोट भरते, शरीर हायड्रेटेड राहते. यातील अँटिऑक्सिडेंट्स शरीराचे मेटॅबॉलिझम वाढवण्यास मदत करतात.

दररोजच्या जेवणामध्ये अळशीचे दाणे भुरभुरावेत किंवा स्मूथीमध्ये घालावेत. यामध्ये ओमेगा-3-फॅटी अॅसिड असल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

हायड्रेशनसाठी कलिंगड सकाळी खाणे हा सर्वोत्तम उपाय आहे. यामध्ये अँटिऑक्सिडेंट्स असून प्रति कप केवळ 40 कॅलरी असतात. त्यामुळे वजन वाढत नाही.

व्हिट ब्रेड (ब्राउन ब्रेड) हा वजन कमी करण्याचा नामी उपाय आहे. याच्यातील फायबरमुळे पोट भरलेले राहते व आतड्यांचे कार्य सुरळीत चालते.

केळे खाल्याने भूक भागते. त्यामुळे मधल्या वेळी भूक लागल्यानंतर केळे हा उत्तम पर्याय आहे.