Food For Sexual Wellness: आपलं आरोग्य हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे मग ते कुठलंही असो. मानसिक, शारिरिक अथवा लैंगिक. आपलं लैंगिक आरोग्यही (Sexual Health) जपणे महत्त्वाचे आहे. अनेकदा आपण यासाठी आपल्या आहारातही बदल करू घेतो. पण आता आम्ही तुम्हाला अशा पदार्थाबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या लैंगिक समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते. हे एकप्रकारचं ड्रायफ्रुट आहे. त्या पदार्थांचं नावं आहे मुनक्का किंवा मनूका. हे एक अतिशय आरोगदायी ड्रायफ्रुट (Dryfruit) आहे. ज्यामुळे तुमचे हृदय चांगले राहते. त्याचसोबतच हाडंही मजबूत होतात. (Food For Sexual Wellness health news this dry fruit can boost immunity)
म्हणूनच कोरडी द्राक्षे ही नुसती किंवा दुधात घालून आपण खाऊ शकतो. मनुका खाल्ल्यानं शरीरात इम्यूनिटी (Immunity) वाढते. त्याचसोबत रक्ताची कमतरताही कमी होते. तेव्हा एकपेक्षाही अनेक फायदे असणाऱ्या मनुकांचा फायदा आपल्या लैंगिक समस्या सुधारण्यासाठीही होऊ शकतो. तेव्हा जाणून घेऊया मनुक्यांचे फायदे काय आहेत?
मनुका एसिडिटी दूर करताता तसेच रक्तदाबही मनुका खाल्ल्यानं सुधारतो. त्याचबरोबर मनुका या भिजवूनही खाव्यात कारण त्यात आवश्यक ती पोषक घटकं असतात. मनुक्यांमध्ये एन्टी-ऑक्सिडंट्सही असतात. अर्धा कप मनुका मध्ये 45 मिलीग्राम कॅल्शियम (Calcium) असते. त्यामुळे मनुका खाण्याचे एक नाही तर अनेक फायदे आहेत. रोज सकाळी मनुक्यांचे सेवन तुमच्या शरीराला नक्कीच फायदेशीर ठरू शकते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)