Winter Foot Care: हिवाळ्यात पायांची निगा राखणं महत्त्वाचं असतं. कोरड्या वातावरणामुळे हिवाळ्यात पायांना भेगा पडणं, स्ट्रेस फ्रॅक्चरच्या समस्या आढळून येतात. हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी झाल्यामुळे शरीरातील व्हिटॅमिन डीचे प्रमाण कमी होऊन हाडांची डेंसिटी कमी होते.
नवी मुंबईच्या रूग्णालयातील ऑर्थोपेडिक्स आणि रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ प्रमोद भोर म्हणाले, एखाद्याची हाडे नाजूक असतील तर अशा व्यक्तींना फ्रॅक्चर किंवा दुखापतीची शक्यता अधिक असते. थंड हवामानात आधीपासूनच असलेल्या समस्या आणखी वाढवू शकतात. यामुळे नवीन समस्यांना कारणीभूत ठरतात.
हिवाळ्यात वारंवार उद्भवणारी आणखी एक समस्या म्हणजे प्लांटर फॅसिटायटिस (टाचदुखी). थंड वातावरणामुळे पायातील टिश्यू आकुंचन पावतात, ज्यामुळे पायाच्या संवेदनशील भागांवर अतिरिक्त ताण पडून जळजळ आणि अस्वस्थता निर्माण होते.