आंबा फ्रीजमध्ये ठेवावा की नाही? काय सांगतात तज्ज्ञ, जाणून घ्या

आपण बऱ्याचदा आंबा घेतल्यानंतर त्याला फ्रीजमध्ये ठेवतो. असं करण्यामागे वेगवेगळी कारणं आहेत.

Updated: Apr 19, 2022, 05:42 PM IST
आंबा फ्रीजमध्ये ठेवावा की नाही? काय सांगतात तज्ज्ञ, जाणून घ्या title=

मुंबई : आंबे खाण्याचे शौकीन असलेले लोक, हे उन्हाळ्याची आतुरतेनं वाट पाहातात, कारण हा सिजन कितीही कंटाळवाणा वाटला, तरी आंबे खायला मिळणार या विचाराने लोकांना तृप्त झाल्यासारखे वाटते. गावी गेल्यानंतर तर आंब्यांची कमी नसते येथे झाडावरील आंबे असेच आपल्याला खायला मिळतात. तर काही वेळेला आपल्याला ते विकत देखील घ्यायला लावतात. आपण बऱ्याचदा आंबा घेतल्यानंतर त्याला फ्रीजमध्ये ठेवतो. असं करण्यामागे वेगवेगळी कारणं आहेत. जसे काही लोकांना आंबा थंड खायला आवडतो, तर काही लोक आंबे चांगले आणि टिकून राहण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवतो. तर काही लोकांना हे माहित नसतं की, आंबे हे फ्रीजमध्ये ठेवावेत की नाहीत. ज्यामुळे नेहमीच लोकं या संभ्रमात पडतात.

तर आंबा कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये, असे अन्नतज्ज्ञांचे मत आहे. कारण यामुळे याचा पोषण मूल्य आणि चाचणी या दोन्हींवर परिणाम होतो. फ्रिजमध्ये आंबे न ठेवणे चांगले.

चला जाणून घेऊ या आंबा ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे.

आंबा कसा ठेवायचा?

१- जर तुमच्याकडे कच्चे आंबे असतील, तर ते कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका. फ्रीजमध्ये ठेवल्याने ते नीट पिकत नाहीत आणि त्याच्या चवीवरही परिणाम होतो.
२- आंबा नेहमी खोलीच्या तपमानावर ठेवावा आणि त्याला पिकायला ठेवावे. यामुळे आंबा अधिक गोड आणि मऊ राहातो.
३- आंबा पूर्ण पिकल्यावर तो खाण्यापूर्वी थोडा वेळ थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता.
४- तुम्ही पिकलेले आंबे फ्रजमध्ये ५ दिवसांपर्यंत ठेवू शकता.
5- जर तुम्हाला आंबा लवकर पिकवायचा असेल, तर रुम ट्रेम्प्रेचरला कागदाच्या पिशवीत ठेवा. यामुळे आंबे लवकर पिकतील.
६- जर तुम्हाला आंबे काही दिवसांसाठी ठेवायचे असेल, तर ते सोलून, कापून बंद डब्यात ठेवा. तुम्ही त्यांना फ्रीझरमध्ये 6 महिन्यांपर्यंत ठेवू शकता.
7- अनेक वेळा फ्रीजमध्ये जागा नसल्यामुळे आंबे इतर फळे आणि भाज्यांसोबत ठेवले जातात, जे चुकीचे आहे. इतर फळे आणि भाज्यांसोबत आंबा ठेवल्यानेही चवीत फरक पडतो.

आंबा फ्रीजच्या बाहेर ठेवा

एका अहवालानुसार, आंबा आणि इतर पल्पी फळे फक्त खोलीच्या तापमानावर ठेवणे चांगले आहे. फ्रिजमधून आंबा सामान्य तापमानात ठेवल्यास त्यात असलेले अँटी-ऑक्सिडंट सक्रिय राहतात आणि त्यामुळे आरोग्यासाठी अनेक फायदे होतात.

आंब्याव्यतिरिक्त इतर उष्णकटिबंधीय फळेही फ्रीजमध्ये ठेवू नयेत, असे तज्ज्ञांचे मत आहे.