मुंबई : अक्रोड आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अक्रोडमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि हेल्दी फॅट्स यांसारखे अनेक पोषक घटक असतात, जे मेंदूला गती देऊ शकतात. यासोबतच अनेकांची स्मरणशक्ती वाढवते. थायरॉईड सारख्या समस्या दूर करण्यासाठी देखील हे प्रभावी ठरू शकते. सकाळी रिकाम्या पोटी अक्रोडचे सेवन केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. हे फायदे कोणते आहेत ते जाणून घेऊयात.
कर्करोगाचा धोका होतो कमी
अक्रोड खाल्ल्याने कर्करोग टाळता येतो. यामुळे प्रोस्टेट कॅन्सर, कोलोरेक्टल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर यांसारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो. अक्रोडमध्ये पॉलीफेनॉल इलाजिटानिन्स आढळतात जे तुम्हाला कॅन्सरपासून वाचवण्यास मदत करतात.
हाडे मजबूत करतात
रोज अक्रोड खाल्ल्याने हाडे आणि दातांची ताकद वाढवता येते. यामध्ये असलेले अल्फा-लिनोलेनिक ऍसिड हाडांची ताकद वाढवू शकते.
वजन कमी
भिजवलेल्या अक्रोडाचे सेवन केल्याने शरीराचे वाढते वजनही नियंत्रणात ठेवता येते. यामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असल्याने वजन कमी होते. त्याचवेळी, त्यात कॅलरीजचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे वजन नियंत्रित होते.
हृदय निरोगी ठेवतो
अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड असते जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करू शकते. ज्यामुळे तुमचे वाढते वजन कमी होऊ शकते.
मधुमेह नियंत्रित ठेवतो
सकाळी रिकाम्या पोटी अक्रोडाचे सेवन केल्याने मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. विशेषत: याच्या सेवनाने तुम्हाला टाइप-2 मधुमेहाचा धोका कमी होतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. अवलंब करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)