Garlic Side Effects: 'या' लोकांनी चुकूनही खाऊ नयेत लसणाचे पदार्थ; होतात गंभीर परिणाम!

Garlic Side Effects: लसूण खाणं आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याचबरोबर आपल्याला थंडीतही लसणाचा चांगला उपयोग करून घेता येतो. लसणाचे अनेक पदार्थही आपण तयार करतो. त्यामुळे लसणाला आपल्या आहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु काही लोकांसाठी मात्र लसूण खाणं हे हानिकारक आहे. 

Updated: Jan 3, 2023, 07:34 PM IST
Garlic Side Effects: 'या' लोकांनी चुकूनही खाऊ नयेत लसणाचे पदार्थ; होतात गंभीर परिणाम!  title=
garlic news

Garlic Side Effects: लसणाचे आपल्या (garlic tips) आहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे आपण कायमच असा विचार करतो की आपण आपल्या आहारात (Garlic in indian spices) भाजी किंवा तत्सम तिखट पदार्थांमध्ये लसणाचा वापर करून घ्यावा. लसूण आपण वेगवेगळ्या तिखट पदार्थांमध्येही घेऊ शकतो. लसणानं आपल्या आहारात भाज्यांना, आमट्यांना चवही (indian food and spices) येते. त्याचसोबत आजारपणातही आपल्या लसणाचा आपल्या पदार्थांमध्ये वापर करून घेता येतो. हिवाळ्यातही आपण लसणाच्या पदार्थांचा उपयोग करून घेऊ शकतो. लसणाची खासियत म्हणजे आपण आपल्या फोडणीत किंवा तडक्यातही लसणाचा वापर करून घेतो. लसणाचे असेच एक नाही तर अनेक फायदे (garlic benefits) असल्याने आपल्याला लसणाचा आपल्या आहारात खूप फायदा होतो परंतु तुम्हाला माहितीये का की काही लोकांसाठी लसूण खाणं हे त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. तेव्हा जाणून घेऊया कोणाला लसणाचे नक्की साईड इफेक्टस काय आहेत? (eating garlic side effects these people should avoid consuming garlic can face harmful effects on body)

कोणत्या लोकांनी लसूण खाणं टाळावे? 

काही लोकांना अनेकदा काही रोग किंवा आजारपणं जन्मत: असतात पण अशा काही शारिरीक अवस्थेतील (health news) लोकांनी लसूण न खाल्लेली बरी. खासकरून जी लोकं रक्त पातळ करण्यासाठी काही औषधं घेतात त्यांनी तरी निदान लसूण खाऊ नये. त्याचबरोबर ज्यांना घामामुळे शरीराला दुर्गंध येतो आणि तोंडाला वास येतो त्यांनी लसणाचे सेवन करू नये. ज्यांना अशा समस्या आहेत त्यांनी लसणाचे सेवन केल्यास त्यांना काही समस्या अधिक येऊ शकतात. तेव्हा अशांना लसूण आणि लसणाचे पदार्थ खाऊ नयेत. ज्यांना एसिडिटीचा (acidity) त्रास आहे त्यांनी खासकरून लसूण हा पदार्थ खाऊ नये. त्याचसोबत जर तुम्हाला एसिडिटीचा त्रास खूप दिवस असेल किंवा तो वाढत असेल तर कृपया करून लसणाच्या पदार्थांपासून लांब राहा. तुमची समस्या अजून वाढण्याची शक्यता आहे. त्याचसोबत ज्यांचे पोट कायम खराब राहते त्यांनी तर लसणाचे पदार्थ खाऊ नयेत. रिकाम्या पोटीही अशांना अशाप्रकारे लसणं खाऊ नये त्यानं तुमच्या शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतो. 

लसणाचे फायदे काय आहेत? 

लसणात एन्टीबायोटिक्स असतात. त्याचबरोबर लसणानं आपल्या शरीरातील इम्यूनिटी (immunity) म्हणजे रोगप्रतिकारक्षमताही वाढते. ज्याप्रकारे प्रत्येक पदार्थात काही फायदे असतात त्याप्रमाणे त्यात तोटेही असतात. लसणातही अनेक फायदे आहेत. लसून खाल्ल्यानंतर बल्ड प्रेशर आणि कोलेस्ट्रोल नियत्रंणात राहते. लसणाचा उपयोग आपल्या भारतीय पदार्थांमध्ये सहज होतो त्यामुळे आपण लसणाची फोडणी, तडका आणि चटणी बनवतो. गार्लिक ब्रेडचाही आपल्या ब्रेकफास्टमध्ये उपयोग करून घेतो. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)