मुंबई : आहारात भाज्यांना जास्त महत्व आहे. बाजारात अनेक भाज्या मिळतात. मात्र, या नेमक्या भाज्या घेतल्या आणि त्याचा भोजनात वापर केलात तर तुमचे आरोग्य नक्कीच चांगले राहण्यास मदत होईल. त्यामुळे या भाज्यांवर भर दिला तर तुम्हाला प्रोटीनसह जी प्रथिने आवश्यक आहेत, तिही मिळतील. त्यामुळे तुमच्या आहारात या भाज्यांना प्राधान्य द्या.
गाजर खल्ल्याने शरीरातील व्हिटॅमिन्सची कमतरता भरुन निघते. गाजराशिवाय मेथीमध्येही भरपूर प्रमाणात पोषकद्रव्ये असतात. कॉलेस्टोरॉल कमी करण्यासाठी मेथी फायदेशीर ठरते. याशिवाय पचनशक्ती सुधारण्यासाठी, स्टमक इन्फेक्शन दूर करण्यासाठी, तोंडाचा अल्सर आणि मधुमेहावरही मेथी गुणकारी आहे.
सुरणाची भाजी आरोग्यास इकदम उत्तम. यात मोठ्या प्रमाणात स्टार्च असते. सुरण उपलब्ध नसल्यास बटाटेसुद्धा खाऊ शकता. सुरण भाजीमुळे सातत्याने होणाऱ्या उलट्या थांबतात. कॅन्सरचे विषाणू नष्ट होण्यास मदत होते.
मार्केटमध्ये कांद्याची पाती उपलब्ध होते. पातीच्या कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. याभाजीबरोबर हिरव्या पालेभाज्यासुद्धा खाऊ शकता. यामध्ये भरपूर फायबर असते. व्हिटॅमिन C ची कमतरता भरुन काढण्यासाठी मदत होते.
पालकमुळे शरीरातील फायबर्स आणि पोटॅशियमची कमतरता भरुन निघते. पालकामध्ये अनेक पोषकद्रव्ये असतात. पालकाप्रमाणेच या भाज्यांमध्येही मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात. चिंचसुद्धा शरीरातील पोटॅशियमची गरज पूर्ण करते.
ओले मटारमध्ये प्रोटिन्स असतात. प्रोटिनच्या प्रमाणाच्या बाबतीत मटार इतर भाज्यांपेक्षा नक्कीच सरस ठरतात. त्यामुळे आहारात ओले मटार हवेत.
लिंबात व्हिटॅमिन C मोठ्या प्रमाणात असते. लिंबाच्या नियमित सेवनामुळे त्वचा आणि केसांना चकाकी मिळते. तसेच मोठ्या प्रमाणावर लोह असते. लिंबू आवडत नसेल तर आवळा हासुद्धा एक चांगला पर्याय आहे. आवळा लिंबापेक्षा स्वस्त असतो आणि त्यात व्हिटॅमिन सी भरपूर असते. आवळ्यामध्ये लोह असते. आवळ्यामुळे त्वचेचे विषारी पदार्थांपासून रक्षण होते.