मुंबई : जेवताना पाणी पिऊ नये असा सल्ला दिला जातो. यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी पिणे गरजेचे असते.
पाणी योग्य वेळेस प्यायले तर ते औषधाचे काम करते मात्र चुकीच्या वेळेस प्यायल्यास आरोग्याच्या समस्या होऊ शकतात. जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास वजन वाढणे, बीपी वाढणे तसेच अपचनचा त्रास होऊ शकतो.
खाण्याच्या अर्धा तास आधी एक ग्लास पाणी प्यायल्यास पचनशक्ती सुधारते. वजन कमी होते. तसेच एनर्जीही मिळते. याशिवाय स्कीनचा टोनही सुधारतो. तसेच डायबिटीजपासूनही बचाव होतो.