टो़मॅटो खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहे का?

टो़मॅटो खाण्याचे काही फायदे तुम्हांला माहिती असतील.  पण आज आम्ही तुम्हांला टो़मॅटो खाण्याने इतर काय फायदे होणार ते सांगणार आहोत. नविन संशोधनात असे समोर आले आहे की, टो़मॅटो दररोज खाण्याने  त्वचा कर्करोगापासून आपण लांब राहू शकतो. संशोधकांच्या अभ्यासानुसार टो़मॅटो खाल्याने  कॅन्सरशी लढण्याची क्षमता तीव्र होते.

Updated: Jul 19, 2017, 09:27 AM IST
टो़मॅटो खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहे का? title=

मुंबई : टो़मॅटो खाण्याचे काही फायदे तुम्हांला माहिती असतील.  पण आज आम्ही तुम्हांला टो़मॅटो खाण्याने इतर काय फायदे होणार ते सांगणार आहोत. नविन संशोधनात असे समोर आले आहे की, टो़मॅटो दररोज खाण्याने  त्वचा कर्करोगापासून आपण लांब राहू शकतो. संशोधकांच्या अभ्यासानुसार टो़मॅटो खाल्याने  कॅन्सरशी लढण्याची क्षमता तीव्र होते.

वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. की, टो़मॅटोच्या लाल रंगाने सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण होण्यास निश्चित मदत होते. तसेच टो़मॅटो कॅन्सरच्या टयूमरला वाढायला आणि नष्ट करण्यासही मदत होते. नविन संशोधनानुसार लाल रंगाच्या टो़मॅटोमध्ये कॅरोटिनॉयड नावाचे घटक आहे. जो टयूमर कमी करण्यास मदत होते.
 
लाइकोपीन नावाचे रसायन टो़मॅटोमध्ये आढळले जाते जे कर्करोगाशी लढण्यास सक्षम आहे. संशोधनानुसार लेखक डॉ.जेसिका कूपरस्टोन  ने म्हटले की,  फळ आणि भाजी हे कूठलंही औषध  नाहीय.  परंतु यांच्या सेवनाने कुठला ही आजार कमी होण्यास मदत होते. तसेच नॉन मेलेनोमा हा त्वचेचा कर्करोग हा जगात सर्वांत मोठा त्वचेचा कर्करोग आहे.  जगात हजारो लोग कॅन्सरग्रस्त आहे.

शास्त्रज्ञानाच्या अभ्यासानुसार ओहियो स्टेट यूनिवर्सिटीने उंदरावर संशोधन केलं आहे.
त्यांनी उंदराचे दोन गट केले. एका गटात आहारात ३५ आठवडयापर्य़ंत टो़मॅटोच्या पावडरचा समावेश आहे. तर दुसऱ्यात काहीच नव्हतं. त्यानंतर दोन्ही गटाला सुर्याच्या अतिनील किरणांमध्ये ठेवण्यात आले. यामध्ये असे दिसून आले की, ज्या उंदराला टो़मॅटोची पावडर देण्यात आली होती, त्यात  कॅन्सर होण्याची शक्यता ५०टक्के कमी झाली होती.

ब्रिटिश स्किन फाउंडेशनचे प्रवक्ते डॉक्टर राचेल एबॉट यांनी म्हटले, या संशोधनाच्या आधारे माणसांवर टो़मॅटोचे गुण निष्कर्ष करण्यासाठी ही योजना आहे. त्यांनी असे सांगितले की,  त्वचेच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करणे फार महत्वाचे आहे. टो़मॅटो खाल्ल्याने रोगापासून लांब राहू शकतो.

टो़मॅटोच्या व्यतिरिक्त सर्व फळ आणि भाजी आहेत. जे कर्करोगापासून लढण्यास सक्षम आहे. मिरची, गाजर आणि बटाटेचं सेवन याने  महिलांचे गर्भाशयाचे  कॅन्सर कमी करण्यास निश्चितच मदत होईल. १५ वर्षांत १५ हजार  महिलांवर झालेल्या या शोधानुसार हे उघड झाले आहे. भाज्या खाण्याने प्रोटेस्ट कॅन्सरचा धोका कमी आहे.

वैद्यकीय चाचण्यानुसार हे समोर आलं की कॅरोटिनॉइड सन बर्नला ही चांगलं ठेवण्यास मदत होते.  हे खाल्ल्यानंतर एंटीऑक्सीडेंट यौगिक विशेषत: लाइकोपीन त्वचेवर जमा होऊन कॅन्सरग्रस्ताला टयूमर होण्यापासून मदत करतो. या संशोधनात हे सांगण्यात आलं की,टो़मॅटो खाल्ल्याने पोटाचा कॅन्सर कमी करण्यास मदत करते.  तसेच स्तन आणि पूर्ण कॅन्सर कमी करण्यासही मदत होते. तर लसूण स्तन, पोटाचा  कॅन्सरला ही प्रतिबंधित करते.