गरजेपेक्षा जास्त पाणी पिणं आरोग्यासाठी घातक? मग जास्तच जास्त किती?

आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की, पाणी हे आपल्या शारीरिक आरोग्यासाठी फार गरजेचं आहे.

Updated: May 27, 2022, 12:09 PM IST
गरजेपेक्षा जास्त पाणी पिणं आरोग्यासाठी घातक? मग जास्तच जास्त किती? title=

मुंबई : आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की, पाणी हे आपल्या शारीरिक आरोग्यासाठी फार गरजेचं आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशनचा त्रास उद्भवून अनेक समस्यांना तोडं द्यावं लागू शकतं. मात्र जास्त प्रमाणात पाणी प्यायलं तर? 

तुम्हाला कल्पना आहे का की, गरजेपेक्षा जास्त पाणी पिणंही आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतो.

उन्हाळ्याच्या दिवसांत अधिक प्रमाणात तहान लागते. कोणतीही गोष्ट जास्त खाणं किंवा पिणं शरीरासाठी धोकादायक असतेच. त्याचप्रमाणे गरजेपेक्षा जास्त पाणी पिणं धोकादायक ठरू शकतं. याला वॉटर इनटॉक्सिकेशन किंवा वॉटर पॉयझनिंग म्हटलं जातं. यादरम्यान रक्तात ऑक्सिजनची लेवल वाढते ज्यामुळे मृत्यू होण्याचा धोका ओढावू शकतो.

तज्ज्ञांच्या माहितीप्रमाणे, एखादी व्यक्ती जास्तीत जास्त 3 ते 4 लीटर पाणी पिऊ शकते. मुख्य म्हणजे ज्या व्यक्तींना कंजेस्टिव्ह हार्ट फेल्यूअर, क्रोनिक किडनी डिसीज किंवा लिव्हर सिरॉसिस असे त्रास असतील त्यांनी प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे.

मुळात सामान्य व्यक्तींनी पाणी प्यायल्यास शरीरातील सोडियमची मात्रा कमी होते. यामुळे थकवा किंवा डोकेदुखीची समस्या उद्भवू शकते. सोडियम कमी होणं काही जीवासाठीही धोकादायक ठरू शकतं.

गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्याने ओव्हरहायड्रेशनची समस्या बळावू शकते. याचा परिणाम किडनीवर होतो. किडनी शरीरातील पाण्याला फिल्टर करण्याचं काम करते. त्यामुळे जास्त पाणी प्यायल्यास किडनीवर परिणाम होऊन किडनी फेल होण्याचा धोकाही बळावतो.