Ovarian cancer: कर्करोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी वेळीच निदान आणि उपचार करणे महत्त्वाचे आहे. ओव्हेरियन कॅन्सर (अंडाशयाचा कर्करोग) हा जगभरातील महिलांना प्रभावित करणाऱ्या सर्वात घातक कर्करोगांपैकी एक आहे. त्याची चिन्हे आणि लक्षणे वेळीच ओळखून त्वरीत उपचार करणे महत्वाचे आहे. या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, ओव्हेरियन कॅन्सरविषयी जागरुकता वाढवून आणि स्त्रियांना त्यांनी दुर्लक्ष करू नये याकरिता वेळीच लक्षणे ओळखण्यासाठी साक्षर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
तळेगावच्या रेडिएशन आणि क्लिनिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. ज्योती मेहता यांनी सांगितलं की, ओव्हेरियन कॅन्सर तेव्हा होतो जेव्हा अंडाशयातील पेशी वाढू लागतात आणि हळूहळू पसरतात. या प्रक्रियेमुळे कर्करोगाची गाठ तयार होते. हे कोणत्याही वयोगटातील स्त्रियांना प्रभावित करू शकते. 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांमध्ये याचे निदान केले जाते.
ओटीपोट दुखणे, फुगणे किंवा सूज येणे
महिलांना ओटीपोट सतत फुगल्यासारखे वाटणे किंवा सूज येऊ शकते आणि त्यामुळे बहुतेकदा अस्वस्थता वाटू शकते.
लवकर पोट भरणे
हे लक्षण सामान्यतः अंडाशयाचा कर्करोगाशी संबंधित आहे आणि भूक न लागणे किंवा लवकर तृप्त होणे अशी लक्षणे दिसून येतात.
ओटीपोटात दुखणे
ओटीपोटात तीव्र वेदना होतात जी मासिक पाळी किंवा पाचन समस्यांशी संबंधित नसतात. यासाठी वैद्यकिय तपासणी आवश्यक आहे
आतड्याच्या कार्यात बदल
अंडाशयाचा कर्करोगामुळे आतड्याच्या कार्यात बदल होऊ शकतो, जसे की बद्धकोष्ठता, अतिसार किंवा सतत शौचास जावे लागणे.
वारंवार लघवी होणे
स्त्रियांना सतत लघवीची भावना निर्माण होणे, विशेषतः जर ती कायम राहिली आणि मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे होत नसली तर त्याकडे दुर्लक्ष करु नका.
अचानक वजन कमी होणे किंवा वाढणे
अचानक वजन कमी होणे, हे अंडाशयाच्या कर्करोगासह अंतर्निहित आरोग्य समस्यांचे लक्षण असू शकते.
थकवा
सततचा थकवा किंवा दैनंदिन कामात व्यत्यय आणणारी कमी उर्जा ही अंडाशयाच्या कर्करोगाचा संकेत देऊ शकते.
पाठदुखी
अंडाशयाच्या कर्करोगामुळे पाठीच्या खालच्या भागात वेदना जाणवतात. ज्याला सौम्य पाठदुखी म्हटले जाते.
अंडाशयाचा कर्करोगाची वेळीच तपासणी केल्याने उपचार परिणामांमध्ये लक्षणीय सुधारणा होते आणि जगण्याची दर वाढतो.
अंडाशयाचा कर्करोगासाठी वय आणि कौटुंबिक इतिहास यासारख्या काही घटकांवर नियंत्रण ठेवता येत नसले तरी, त्याचा धोका कमी करण्यासाठी काही गोष्टींचे पालन करता येऊ शकते: