वर्कआऊट केल्यानंतर येणारा घाम त्वचेसाठी नुकसानदायक?

फिजिकल एक्टिविटी त्वचेसाठीही फायदेशीर मानली जाते.

Updated: Apr 22, 2022, 07:58 AM IST
वर्कआऊट केल्यानंतर येणारा घाम त्वचेसाठी नुकसानदायक? title=

मुंबई : एक्सरसाइज करताना त्याचा पूर्ण फायदा तुमच्या शरीराला मिळतो. मेहनत केल्यानंतर येणार घाम तुमच्या शरीरातून टॉक्सिन्स बाहेर काढतो. काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे, वर्कआऊट केल्यानंतर येणारा घाम त्वचेला ऑयली करतो. शिवाय यामुळे त्वचेला काही प्रमाणात नुकसान होण्याचीही शक्यता असते. मात्र हे खरं आहे का? जाणून घेऊया.

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, फिजिकल एक्टिविटी त्वचेसाठीही फायदेशीर मानली जाते. यामुळे त्वचेला नैसर्गिक आणि हेल्दी ग्लो मिळण्यास मदत होते. पण वर्कआउट्स दरम्यान येणाऱ्या घामामुळे देखील त्वचेच्या समस्या जसं की मुरुम, लालसरपणा आणि पुरळ उठू शकतात. त्यामुळे वर्कआऊट करताना काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

एक्सरसाइज करताना घामामुळे त्रास होऊ नये म्हणून काही खास टीप्स

  • वर्कआउट करण्यापूर्वी चेहरा धुवा. जर तुमचा मेकअप असेल, तर तुम्ही क्लीन्सरने पूर्णपणे काढून टाका. यासाठी सौम्य क्लीन्सर वापरा.
  • व्यायाम करताना घाम, प्रदूषण आणि धूळ पुसण्यासाठी चेहऱ्यासाठी थंड टॉवेल वापरा. जेव्हा तुम्हाला घाम येत असेल तेव्हा कपड्याने तुमचा चेहरा घासू नका कारण यामुळे पुरळ आणि खाज येऊ शकत्या वाढते.
  • व्यायामादरम्यान वापरण्यासाठी टोनर, फेशियल मिस्ट तुमच्याजवळ ठेवा. तसंच, स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी नियमित अंतराने पाणी प्या.
  • एकदा एक्सरसाइज केल्यानंतर त्वरित तुमचा चेहरा धुवून घ्या. त्वचेवरील छिद्र बंद होण्यासापासून आळा बसेल.