मुंबई : राज्यात कोरोनासोबतच उन्हाचा तडाखा वाढला आहे. एप्रिल - मे महिन्यात कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. या दिवसांमध्ये उष्माघातापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आजी किंवा घरातील जेष्ठ मंडळी खिशात कांदा ठेवायला सांगतात. खरंच खिशात कांदा ठेवल्याने उष्माघातापासून संरक्षण होऊ शकते का? याबाबत वाचा
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कच्चा कांदा खाल्याने उष्णतेच्या विकारांपासून नक्कीच आपले संरक्षण होऊ शकते. परंतु कांदा खिशात ठेवल्याने काही फायदा होत नाही. असं डॉक्टर आणि तज्ज्ञांचं मत आहे.
कांद्यामध्ये क्वेरसेटिन नावाचे तत्व असते. जे शरिराचे तापमान कमी करण्यास मदत करतात. सोबतच त्वचेवर होणाऱ्या रॅशेसच्या समस्या देखील दूर ठेवतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कांदा खाल्याने शरिरात इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता भासत नाही.
आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते, उन्हाळा लागल्यास कांद्याचा रस पायांच्या तळव्याला लावल्याने शरिराचे तापमान संतुलित होते. तीव्र उष्णता आणि गरम वाऱ्यांपासून याने संरक्षण होऊ शकते.