नवी Kidney transplant केल्यानंतर निरुपयोगी किडनीचं डॉक्टर काय करतात?

किडनी डॅमेज (Kidney damage) झाली की आजकाल बऱ्याचदा डॉक्टर (Doctor) किडनी ट्रान्सप्लांट (Kidney transplant) करण्याचा सल्ला दिला जातो.

Updated: Nov 13, 2022, 04:39 PM IST
नवी Kidney transplant केल्यानंतर निरुपयोगी किडनीचं डॉक्टर काय करतात? title=

Kidney transplant : किडनी डॅमेज (Kidney damage) झाली की आजकाल बऱ्याचदा डॉक्टर (Doctor) किडनी ट्रान्सप्लांट (Kidney transplant) करण्याचा सल्ला दिला जातो. मधुमेह आणि हाय ब्लड प्रेशरच्या (High blood pressure) त्रासामुळे किडनी फेल होण्याचा धोका असतो. शरीरात साखरेचं प्रमाण अधिक आणि उच्च रक्तदाब किडनीच्या रक्तवाहिन्यांना त्रास होता. परिणामी किडनी काम करणं बंद करते. मात्र या व्यतिरीक्त अजूनही कारणं आहेत, ज्यामुळे किडनी डॅमेज होण्याचा धोका असतो.

किडनी फेल होण्याची लक्षणं

क्लीवलँड क्लीनिकच्या म्हणण्यानुसार, किडनी फेल होण्याची पहिल्या स्टेजमध्ये कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. मात्र त्यानंतर काही दिवसांनी छोटे-छोटे संकेत दिसू लागतात.

  • अधिक थकवा
  • उलट्या होणं
  • सतत लघवी होणं
  • हात आणि चेहऱ्यावर सूज येणं
  • मसल्स क्रॅम्प 
  • भूक कमी लागणं

किडनी ट्रांसप्लांट कसं केलं जातं?

किडनी ट्रान्सप्लांट करण्यासाठी मोठं ऑपरेशन म्हणजेच शस्त्रक्रिया केली जाते. ज्यामध्ये रूग्णाच्या शरीरात नवीन आणि निरोगी किडणी प्रत्यारोपित केली जाते. ही ट्रान्सप्लांह होणारी किडनी, एखादा दाता किंवा ब्रेनडेड व्यक्तीच्या शरीरातून घेण्यात येते. 

निष्क्रिय किडनीचं काय केलं जातं?

कदाचित तुम्हाला हे उत्तर चकित करू शकतं. UCSF च्या  सर्जरी डिपार्टमेंटच्या माहितीनुसार, जुनी किडनी ही रूग्णाच्या शरीरातून बाहेर काढली जात नाही. नवीन किडनी पोटाच्या खालील भागात प्रत्यारोपित केली जाते. मात्र ज्यावेळी निरुपयोगी किडनीचा आकार खूप मोठा होतो. अशावेळी अनियंत्रित उच्च रक्तदाब आणि किडनी संसर्गासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.