Beer Side Effects: बिअर प्रेमींसाठी वाईट बातमी, रोज 1 ग्लास पिताय तर हे वाचाच?

बिअरपासून शरीराला कोणतेही नुकसान होत नाही, असा बहुतांश नागरिकांचा समज आहे.

Updated: Nov 13, 2022, 03:57 PM IST
Beer Side Effects: बिअर प्रेमींसाठी वाईट बातमी, रोज 1 ग्लास पिताय तर हे वाचाच?  title=

Beer Side Effects: बिअरचे (Beer) नाव ऐकताच डोक्यात दोन गोष्टी येतात. सर्वात आधी पार्टी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्य. लोक नेहमी आनंदाचे क्षण बिअर पिऊन सेलिब्रेट करतात. तर काही लोक निरोगी (Healthy) राहण्यासाठी पितात. बिअरबाबत लोकांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न असतात. बिअरपासून शरीराला कोणतेही नुकसान होत नाही, असा बहुतांश नागरिकांचा समज आहे. त्यामुळे उकाडा आणि चिल्ड बिअर (Beer Benefits) हे अनेकांचं समीकरण बनलेलं आहे.

भारतात जवळपास 30 टक्के लोक बिअर सेवन करतात. बहुतांश लोक मद्यसेवनाऐवजी बिअरला अधिक पसंती देतात. कारण व्हिस्की, रमच्या तुलनेत बिअरमध्ये कमी अल्कोहल (Alcohol) असतं. बिअरची झिंग देखील लवकरच उतरते. कदाचित तुम्हीला बिअरपासून होणाऱ्या नुकसानाबाबत माहिती नसावी. बिअर माईल्ड असो किंवा स्ट्रॉंग, ती शरीरासाठी नुकसानदायक असते.

- जास्त प्रमाणात बिअरचं सेवन केल्यानं पुरुषांच्या सेक्स हार्मोन्सवर परिणाम होतो. बिअरच्या अतिसेवनामुळे पुरुषांची वडील होण्याची क्षमता 50 टक्क्यांनी कमी होते, असा दावा नुकत्याच झालेल्या एका संशोधनात करण्यात आला आहे.

– बिअर नियमित सेवन केल्यानं मेंदूतील पेशी नष्ट होतात. त्यामुळे आपण मन कोणत्याही गोष्टीवर केंद्रित करू शकत नाही. त्याचबरोबर विचार करण्याची शक्तीही कमी होते.

– बिअरच्या सेवनाने यकृतावर मोठा परिणाम होतो. कारण बिअरमध्ये असलेलं अल्कोहोल यकृत खराब करते. त्यामुळे आपली पचनशक्ती पूर्णपणे बिघडते.

वाचा : किडनी खराब होण्याची 'ही' 5 चिन्हे चुकूनही दुर्लक्ष करू नका; नाहीतर होईल हा गंभीर आजार 

– संशोधनानुसार, अतिप्रमाणात बिअर प्यायल्यानं पुरुष-महिलांच्या पोटाचा आकार वाढतो. त्यामुळे त्यांची प्रजनन क्षमता कमी होत आहे. पोटात चरबी वाढल्यानं पुरुषांमध्ये वडील होण्याची क्षमता 10 टक्क्यांनी कमी होत, असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

- पुरुषांमधील लठ्ठपणामुळे शुक्राणू बनवण्याच्या क्षमतेवर परिणाम होत आहे. लठ्ठपणामुळे प्रजनन क्षमता कमी होत असल्याचा दावा या संशोधनात करण्यात आला आहे.